मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या खेळाडूवर उपासमारीची वेळ, प्राजक्ता गोडबोलेची करुण कहाणी

देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या खेळाडूवर उपासमारीची वेळ, प्राजक्ता गोडबोलेची करुण कहाणी

पैसे संपल्यानं या खेळाडूवर सध्या उसनवारी करून पोट भरण्याची वेळ आली आहे.

पैसे संपल्यानं या खेळाडूवर सध्या उसनवारी करून पोट भरण्याची वेळ आली आहे.

पैसे संपल्यानं या खेळाडूवर सध्या उसनवारी करून पोट भरण्याची वेळ आली आहे.

नागपूर, 14 मे : लॉकडाऊनमुळे गोरगरीब कामगार आणि रोजंदारी करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूही या कचाट्यातून सुटले नाहीत. नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला धावपटू प्राजक्‍ता गोडबोलेलाही लॉकडाउनचा फटका बसला आहे. जवळचे पैसे संपल्यानं या खेळाडूवर सध्या उसनवारी करून पोट भरण्याची वेळ आली आहे. सिरसपेठ येथील दहा बाय दहाच्या झोपडीत राहणाऱ्या प्राजक्‍ताचे वडील अर्धांगवायूच्या झटक्‍यामुळे गेल्या सहा वर्षांपासून अंथरुणाला खिळले आहेत. त्यामुळे आई कॅटररकडे स्वयंपाकाचे काम करून परिवाराचे पालनपोषण करते. मात्र, लॉकडाऊनच्या स्थितीत शहरातील मंगल कार्यालये बंद असल्यानं प्राजक्‍ताची आईही सध्या घरीच आहे. कमाईचं साधन बंद असल्यानं गोडबोले परिवाराची सध्या उपासमार होत आहे. हेही वाचा - कोरोनामुळे ग्रामीण भागात भयंकर स्थिती, अंगावर शहारा आणणारी माहिती समोर प्राजक्तानं देशभरातील अनेक क्रॉस कंट्री आणि मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे इटलीतील "वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये देशाचे प्रतिनिधित्त्व केलं आहे. दोन वर्षांपूर्वी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेत तीनं 18 वर्षानंतर सुवर्ण मिळवून दिलं. मात्र, घरची परिस्थिती हलाखीची आहे. लॉकडाऊन मुळं स्पर्धा बंद आहेत. होते नव्हते ते जवळचे पैसे संपले आहे. या कुटुंबाकडून आता उधारीवर रेशन दुकानात मिळणारे धान्य आणलं जात आहे. त्यामुळे सरकारने आपल्या खेळातून देशाची मान अभिमाने उंचावणाऱ्या मात्र सध्या आर्थिक अडचणी सापडलेल्या अशा खेळाडूंनाही मदत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Nagpur

पुढील बातम्या