Home /News /maharashtra /

राज्यात दिवसभरात 23 नवे ओमायक्रोनबाधित, पुण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद, त्यापाठोपाठ मुंबईचा नंबर

राज्यात दिवसभरात 23 नवे ओमायक्रोनबाधित, पुण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद, त्यापाठोपाठ मुंबईचा नंबर

राज्यात आज तब्बल 23 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यात आज आढळलेल्या 23 रुग्णांमध्ये पुण्यातील (Pune) रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

    मुंबई, 23 डिसेंबर : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूने चिंता वाढवली आहे. विशेष म्हणजे काल (22 डिसेंबर) या विषाणूचा महाराष्ट्रात (Maharashtra) एकही रुग्ण आढळला नव्हता. पण राज्यात आज तब्बल 23 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यात आज आढळलेल्या 23 रुग्णांमध्ये पुण्यातील (Pune) रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात तब्बल 13 नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण आणि मनपा हद्दीत प्रत्येकी तीन आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) सात नव्या रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील इतर भागात किती रुग्ण आढळले? पुण्यापाठोपाठ मुंबईत पाच नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळल्याची नोंद आज झाली आहे. तर उस्मानाबादमध्ये दोन रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यापाठोपाठ ठाणे मनपा, नागपूर मनपा आणि मीरा भाईदर मनपा हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहेत. यातील 22 रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर 1 रुग्ण राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेने रिपोर्ट केला आहे. या नव्या रुग्णांमुळे राज्यातील ओमायक्रोनबाधितांचा अधिकृत आकडा हा 88 वर पोहोचला आहे. हेही वाचा : सांगली: लग्न करण्याची तयारी, मात्र केली आत्महत्या; तरुणासह 2 तरुणींनी संपवल जीवन मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढली दुसरीकडे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. मुंबईत आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या चक्क दुपटीने वाढली आहे कोरोना हा गुणाकार करतो. एकदा रुग्णसंख्या वाढायला लागली तर ती दुप्पट किंवा तीनपटीने वाढायला सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. मुंबईत आज 602 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे काल (22 डिसेंबर) हीच संख्या 490 इतकी होती. त्याआधी हीच संख्या 327 इतकी होती. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा हा दररोज आता वाढताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईत आज कोरोनामुळे एका रुग्णाची मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे मुंबईत आज दिवसभरात 207 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 2813 इतकी आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुप्पटीचा दर हा 1747 इतका आहे. ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या राज्यांना सूचना कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूचा संसर्ग भारतातही शेफारत आहे. देशातील तब्बल 16 राज्यांमध्ये या विषाणूने शिरकाव केला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार देशात 269 जणांना ओमायक्रोनची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे संभाव्य भीतीचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने आज आढावा बैठक आयोजित केली होती. केंद्र सरकारने ओमायक्रोनला रोखण्यासाठी सर्व राज्यांना नाईट कर्फ्यूपासून ते सणासुदीला गर्दी जमू नये यासाठी निर्बंध लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हेही वाचा : 'नातं संपलं पण..', सुष्मिता सेनकडून रोहमनसोबतच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केंद्र सरकारच्या राज्यांना पाच महत्त्वपूर्ण सूचना : 1) नाईट कर्फ्यू लावा, गर्दीवर आळा घाला, गर्दीला रोखा. विशेषत: येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यावर कंटेन्मेंट झोन आणि बफर झोन निश््चित करा. 2) टेस्टिंग आणि सर्वेलांसवर विशेष लक्ष द्या. आयसीएआर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचित केलेल्या नियमांनुसारच टेस्टिंग व्हावी. डोअर टू डोअर टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढवा 3) रुग्णालयांमधील बेड्ससर सर्व उपकरणांची संख्या वाढवा. ऑक्सिजनचा स्टॉक वाढवा. पुढच्या 30 दिवसांचा ऑक्सिजनचा साठा साठवून ठेवा. 4) परिस्थितीवर योग्य माहिती द्यावी, प्रेस ब्रफिंग व्हावी, जेणेकरुन गैरसमज पसरणार नाही. 5) 100 टक्के लसीकरणावर फोकस करा.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या