Home /News /maharashtra /

कोरोना इंजेक्शनचा काळाबाजार! एफडीएची मोठी कारवाई, मुंबईत रॅकेटची शक्यता

कोरोना इंजेक्शनचा काळाबाजार! एफडीएची मोठी कारवाई, मुंबईत रॅकेटची शक्यता

कोरोनासाठी वापर होणाऱ्या औषधांची मागणी व उपलब्धता यातील तफावतीमुळे त्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 24 जुलै: मुंबईसह उपनगरात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनासाठी वापर होणाऱ्या औषधांची मागणी व उपलब्धता यातील तफावतीमुळे त्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एका भामट्याविरुद्ध कारवाई केली आहे. मुंबईत मोठं रॅकेट असण्याचा संशय एफडीएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अधिकारी बनावट ग्राहकाद्वारे सापळा रचून रॅकेट शोधून काढण्याचा प्रयत्त्न करत आहेत. हेही वाचा...मोठी बातमी! सरकारी बँकांमध्ये एका वर्षात 1.48 लाख कोटी रुपयांची फसवणूक मिळालेली माहिती अशी की, एफडीएच्या ठाणे कार्यालयात याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. उल्हासनगर 3 मध्ये एक महिला 'टोलसीझुमब अ‍ॅक्टरमा 400' या औषधाची छापील किमंती पेक्षा जास्त दराने विक्री करत होती. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कल्याण पोलिसांच्या क्राईम ब्रॅंच युनिट 3 च्या सहकार्याने सापळा महिलेला अटक केली. निता पंजवानी (रा. उल्हासनगर, 3) असं आरोपी महिलेचं नाव आहे. सिपला कंपनीचे 'टोलसीझुमब अ‍ॅक्टरमा 400'चे इंजेक्शन ज्याची छापील किंमत 40,545 रुपये आहे. आरोपी महिलेला तेच इंजेक्शन 60000 रुपयांना विना औषध चिठी, विना परवाना विक्री करताना रंगेहाथ पकडले. आरोपी महिलेने औषध विक्री करते. रुग्णांचा कोविड अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन याची मागणी अथवा पडताळणी केली नाही. या प्रकरणी औषध निरीक्षक श्रीमती पाष्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भादंवि औषध व सौंदर्यप्रसाधने कायदे 1940 व जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत आरोपी महिलेविरुद्ध उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात औषध विक्री करणाऱ्यांचं मोठं रॅकेट असण्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकरी अशा काळाबाजार करणारे विक्रेत्यांवर नजर ठेवून आहेत. आतापर्यंत एकूण 4 कारवाया करून 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी अशा औषधांचा काळाबाजार व वाजवी किमतीत विक्रीवर यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने आयुक्त अरुण उन्हाळे (अन्न व औषध प्रशासन), सहआयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज, कोकण विभागाचे सहआयुक्त पवनीकर, सहाय्यक आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. हेही वाचा... वेदनांची अखेर! 4 वर्ष कॅन्सरशी मोठ्या हिंमतीने लढणाऱ्या संजीवनीची झुंज अपयशी रुग्णास औषधे छापील दरापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास व औषधाचा काळा बाजार होत असल्यास या बाबतची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800 222 365 /022- 26592362 या वर संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांनी केलं आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या