Home /News /maharashtra /

Corona virus : लहान भावाला पिंपरीत आणायला गेला, घरी आल्यावर दोघांनाही सुरू झाला त्रास आणि...

Corona virus : लहान भावाला पिंपरीत आणायला गेला, घरी आल्यावर दोघांनाही सुरू झाला त्रास आणि...

बारामती शहराच्या हद्दीत राहणाऱ्या या कुटुंबातील लहान भाऊ हा पिंपरी चिंचवडमध्ये नोकरी करत आहे.

बारामती, 16 मार्च :  जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रातही परिस्थितीत चिंताजनक बनली आहे. दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. बारामतीमध्ये दोन भावांना कोरोना व्हायरस झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही संशयित भावांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बारामती शहराच्या हद्दीत राहणाऱ्या या कुटुंबातील लहान भाऊ हा पिंपरी चिंचवडमध्ये नोकरी करत आहे. अचानक काही दिवसांपूर्वी त्याला सर्दी, खोकला आणि घश्यात दुखायला लागलं होतं. आधीच राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे खबरदारी म्हणून मोठा भाऊ पिंपरीमध्ये जाऊन लहान भावाला घरी सोबत घेऊन आला. परंतु, काही दिवसांनी मोठ्या भावालाही सर्दी, खोकला, ताप आणि घसा दुखीचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे दोन्ही भावांना  आज  शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर या दोघांना दुपारी 12 वाजेच्या सुमारास पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. दोन्ही भावांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे का? याची तपासणी सुरू आहे. दोन्ही भावांना सध्या संशयित रुग्ण म्हणून उपचार सुरू आहे. तर दुसरीकडे बारामतीमध्ये बाहेरगावाहुन आलेले 28 रूग्णांना घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आदेश दिले आहे. या 28 जणांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. खबरदारी म्हणून या 28 जणांना होम क्वारंटाइन ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39वर गेली आहे. मुंबईतला कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखीन 5 रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती आहे. मुंबई आणि नवी मुंबईत नवीन ही नवीन रुग्णांची भर पडली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: China, Japan

पुढील बातम्या