मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! हनिमूनला जाण्याऐवजी नवदाम्पत्य रुग्णालयात, एकाच कुटुंबातील 16 जणांना कोरोना

धक्कादायक! हनिमूनला जाण्याऐवजी नवदाम्पत्य रुग्णालयात, एकाच कुटुंबातील 16 जणांना कोरोना

नवरदेव-नवरीसह एकाच कुटुंबातील 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवरदेव-नवरीसह एकाच कुटुंबातील 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवरदेव-नवरीसह एकाच कुटुंबातील 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जळगाव, 26 जून: नवरदेव-नवरीसह एकाच कुटुंबातील 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे हनिमूनला जाण्याऐवजी नवदाम्पत्यावर थेट कोरोना रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली आहे. जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यातील विखरण गावात ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे पाहायला मिळत असल्याने तो नियंत्रित करण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, शासनाच्या उपाय योजनाकडे काही नागरिक गंभीरतेने घेत नसल्याचे पाहायला मिळाले असून अशाच एका घटनेत जळगाव जिल्ह्यातील विखरण गावात नवरदेव-नवरीसह एकाच कुटुंबातील 18 जण कोरोनाची लागण झाली.

हेही वाचा...VIDEO: कोरोनावरून ‘मनसे’चा औरंगाबादमध्ये राडा, उपायुक्तांना खुर्ची फेकून मारली

विखरण या गावात 14 जून रोजी एका पोलीस कर्मचाऱ्याचा विवाह पार पडला होता. या विवाहाच्या दरम्यानच या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची किरकोळ लक्षणे आढळून आली होती. मात्र, किरकोळ लक्षणे असल्याने त्याकडे कोणीही गंभीरतेने घेतलं नाही. मात्र लग्नानंतर 5-6 दिवसांनी नवरदेवाची तब्बेत बिघडली. नवरदेवाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या जवळच्या नातेवाईकांची ही तपासणी करण्यात आली. आता नवरी, फोटोग्राफरसह एकूण 16 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या लग्नात 100 हून अधिक इतरही वऱ्हाडी उपस्थित होते. आणखी काही नातेवाईकाचीही तपासणी होणार आहे.

कोरोनाची लक्षणे आढळताच वेळीच नवरदेवाने चाचणी करून घेतली असती. तसेच लग्नात गर्दी गोळा केली नसती तर इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच प्रादुर्भाव झाला नसता, असं बोललं जात आहे.

हेही वाचा...रामदेव बाबांना मोठा झटका; निम्स म्हणालं, 'आम्ही CORONIL चं ट्रायल केलंच नाही'

पालकमंत्र्यांनी दिला इशारा?

विवाह समारंभाला मुभा देण्यात आलेली असली तरी कोरोनाचा प्रसार वाढू नये, या साठी शासनाच्या नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. मात्र, अशा प्रकारे कोणी त्याच उल्लंघन करीत असेल तर त्यावर यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Coronavirus disease, Coronavirus update, Jalgaon news, Maharashtra news