कोरोनानं एकुलत्या एक मुलाचा घेतला घास; विरह सहन न झाल्यानं माऊलीनंही सोडले प्राण

कोरोनानं एकुलत्या एक मुलाचा घेतला घास; विरह सहन न झाल्यानं माऊलीनंही सोडले प्राण

एकुलत्या एक मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा विरह सहन करून न झाल्यानं जन्मदातीनंही आपला प्राण सोडला आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

कळंब, 05 मे: सध्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Corona cases) झपाट्यानं वाढत आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) अत्यंत घातक ठरत असून राज्यात मृतांच प्रमाणही (Corona patient death) वाढत चाललं आहे. दरम्यान कळंब तालुक्यातील अंदोरा याठिकाणी हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील एका तरुण मुलाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्यानं आईनं अन्नत्याग केला होता. एकुलत्या एक मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्यानं विरह सहन करून न शकणाऱ्या मातेचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित घटना कळंब तालुक्यातील अंदोरा येथील आहे. येथील एका युवकाला काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली. त्यामुळे त्याला बार्शी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांची कोरोना चाचणी केली असता, आई आणि पत्नीचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. बार्शी याठिकाणी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या तरुणाचं अचानक निधन झालं. एकुलत्या एक मुलाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, उपचाराधिन असणाऱ्या आईनं अन्नत्याग केला.

यामुळे त्यांची प्रकृती आणखीचं खालावली आणि त्यांचाही कोरोनामुळं मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांच्या आत कोरोनानं कळंबमधील हे कुटुंब उद्धवस्त करून टाकलं आहे. एकाच कुटुंबातील मायलेकराचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा-मोदीजी, बहिणीला न्याय द्या' पं. छन्नूलाल मिश्रांच्या मुलीची आर्त हाक, VIDEO

मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. पुणे, मुंबई, नागपूर या बड्या शहरांसह आता ग्रामीण भागातही कोरोना आपली पाळंमुळं घट्ट करत आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. तसेच ग्रामीण भागात कोरोना उपचारासाठी योग्य ती सुविधा उपलब्ध नसल्यानं रुग्णांची आणि नातेवाईकांची हेळसांड होतं आहे.

Published by: News18 Desk
First published: May 5, 2021, 11:52 AM IST

ताज्या बातम्या