Home /News /maharashtra /

कोरोनाच्या आजारातून तो वाचला असता पण रुग्णालयातून पळ काढणं भोवलं! भरधाव ट्रकने दिली धडक आणि...

कोरोनाच्या आजारातून तो वाचला असता पण रुग्णालयातून पळ काढणं भोवलं! भरधाव ट्रकने दिली धडक आणि...

Road Accident in Jalana: जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथील एका कोविड सेंटरमधून (Covid Hospital) पळून जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा (Corona Patient) एका रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू (Death in Road accident) झाला आहे. त्याने कोणालाही न सांगता रुग्णालयातून गुपचूप पळ काढला होता.

पुढे वाचा ...
  चंदनझिरा, 05 मे: जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथील एका कोव्हिड सेंटरमधून (Covid Hospital) पळून जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा (Corona Patient) एका रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू (Death in Road accident) झाला आहे. चंदनझिरा येथील एक कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयात कोणालाही काहीही न सांगता गुपचूप रुग्णालयाबाहेर गेला होता. दरम्यान रस्ता ओलांडत असताना एका भरधाव ट्रकनं त्याला जोरात धडक दिली. ज्यामध्ये या रुग्णाचा जागीचं मृत्यू झाला आहे. हा अपघात जालना-औरंगाबाद रोडवरील त्रिमुर्तीजवळ झाला आहे. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मृत कोरोनाबाधित रुग्णाचं नाव राजू पंडितराव गायकवाड (वय- 48) असून ते जालन्यातील भाग्योदयनगर येथील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे ते चंदनझिरा येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु 4 मे रोजी रुग्णालयात कोणालाही न सांगता ते कोव्हिड सेंटरबाहेर पडले. सकाळी साडे अकराच्या सुमारास जालना-औरंगाबाद रस्ता ओलांडताना त्यांना एका भरधाव ट्रकनं जोरात धडक दिली. या दुर्घटनेत गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. हे वाचा-पुणे हादरलं, तडीपार गुंडाने केला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा खून या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.संबंधित मृत व्यक्ती नेमकी कोण आहे? याबाबतची काहीही माहिती पोलिसांकडे नव्हती. मृताची ओळख पटवण्यासाठी पोलसांना बराच कालावधी लागला. पण मृत व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती कळताच अनेकांना घाम सुटला. अपघात झाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार फोन करून देखील रुग्णवाहिका आली नाही. हे वाचा-VIDEO : लॉकडाऊनमध्ये सकाळी फिरायला निघाले; पोलिसांनी घाम गळेपर्यंत घेतला व्यायाम त्यामुळे पोलिसांनी छोट्या मालवाहू वाहनातून न्यावा लागला. संबंधित व्यक्ती कोरोना बाधित असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी हा मृतदेह नगर पालिकेच्या ताब्यात दिला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक जप्त केला असून या घटनेचा अधिक तपास चंदनझिरा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कांबळे करत आहेत.

  तुमच्या शहरातून (औरंगाबाद)

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Accident, Aurangabad, Corona patient

  पुढील बातम्या