मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबई-पुण्यानंतर या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर; 1 महिन्यात 500 टक्क्यांपर्यंत वाढला संसर्ग

मुंबई-पुण्यानंतर या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर; 1 महिन्यात 500 टक्क्यांपर्यंत वाढला संसर्ग

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 49 हजार 399 एवढी झाली आहे.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 49 हजार 399 एवढी झाली आहे.

मुंबई, पुणे, ठाणे ही शहरं तर कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहेत, आता ग्रामीण भागात कोरोना मोठ्या संख्येने वाढत आहे.

    मुंबई, 1 सप्टेंबर : देशभरातील कोरोनाच्या एकूण प्रकरणांपैकी 21 टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. अद्यापही राज्यात कोरोना रुग्णांवर नियंत्रण आणणे शक्य झाले नाही. अनलॉक - 4 मध्ये विविध क्षेत्रातील नियम शिथिल करण्यात आले आहेत. याच्या आधारावर राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये संसर्ग तब्बल 500 टक्क्यांनी वाढला आहे. बीड, सांगली, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि नागपूर या जिल्ह्यात अनलॉक - 4 मध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने यामागील कारणे सांगितली आहेत. पुरामुळे राज्यात मोठा फटका बसला आहे. त्यात कोरोनाच्या संसर्गात 780689 रुग्णसंख्येसह देशातील सर्वात जास्त संख्या असलेले राज्य म्हणून समोर आले आहे. म्हणजेच देशातील एकूण 21 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे  ही शहरे कोरोना हॉटस्पॉट आहेत. यानंतर आता आणखी पाच जिल्ह्यांमुळे चिंता वाढली आहे. या भागात संसर्गाची प्रकरणं तब्बल 500 टक्क्यांनी वाढत असल्याचे दिसत आहे. बीडमध्ये गेल्या 31 दिवसात रुग्णसंख्या 757 पासून 4716 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच 600 टक्क्यांची वाढ झाली आहे. उस्मानाबादमध्ये 1 ऑगस्ट रोजी 971 रुग्णसंख्या होती जी 31 ऑगस्टपर्यंत वाढून 5780 पर्यंत पोहोचली आहे. नागपूरात एका महिन्यात रुग्णसंख्या 4835 हून वाढून 27241 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच तब्बल 500 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर सांगली आणि कोल्हापूरमध्येही साधारण 450 ते 500 टक्क्यांपर्यंत संसर्गात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हे ही वाचा-कोरोनाला हरवल्यानंतर गृहमंत्री अमित शहा लागले कामाला; बैठकीतील फोटो केला शेअर आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, या सर्व जिल्ह्यात सरकारी रुग्णांलयांची संख्या अत्यंत कमी आहे. पहिल्यापासूनच सरकारने या ग्रामीण भागात फार लक्ष दिले नव्हते. ग्रामीण व्यतिरिक्त खासगींची संख्याही कमी आहे. याबरोबरच येथे चाचण्याही फारशा उपलब्ध नाही. या भागात परिणामकारक मेडिसिन म्हणजे रेमडेसिव्हीर आणि टोसीलिजूमाब यांचं प्रमाणही कमी आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या