• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून इथं आहे, उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य, VIDEO

कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून इथं आहे, उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य, VIDEO

वास्तविक पाहता कोरोनाचा जो काळ होता, तो आहे आणि राहणार. कोणी जर म्हणत असेल कोरोना जाणार नाही

वास्तविक पाहता कोरोनाचा जो काळ होता, तो आहे आणि राहणार. कोणी जर म्हणत असेल कोरोना जाणार नाही

वास्तविक पाहता कोरोनाचा जो काळ होता, तो आहे आणि राहणार. कोणी जर म्हणत असेल कोरोना जाणार नाही.

  • Share this:
सातारा, 21 सप्टेंबर : राज्यात कोरोनाची (corona) लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची भीती मात्र कायम आहे. कोरोना लवकरच हद्दपार व्हावा यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. पण, कोरोना आपल्या इथून जाणार नाही, तो आपल्या जन्माच्या आधीपासून होता, असं अजब व्यक्तव्य भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ( Udayan Raje Bhosale ) यांनी केलं आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून सैनिक भरती झालेली नसून शासनाने भरतीसाठीची मर्यादा वर्षे वाढवून द्यावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी उदयनराजे यांनी अचानक आंदोलनस्थळी भेट दिली. त्यानंतर उदयनराजेंनी आंदोलकांशी संवाद साधला. वास्तविक पाहता कोरोनाचा जो काळ होता, तो आहे आणि राहणार. कोणी जर म्हणत असेल कोरोना जाणार नाही, तर कोरोना हा आपल्या जन्माच्या आधीपासून इथं आहे. कोणी जरी म्हटलं तरी कोरोना हा जाणार नाही, हे तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, असं विधान उदयनराजेंनी केलं. तसंच, तुमच्याकडे जो मोबाईल फोन आहे. जरा पिक्चर वगैरे पाहण्यापेक्षा सायन्सच्या गोष्टीचं वाचन करा, असा सल्लाच उदयनराजेंनी उपस्थिती लोकांनी दिला. बॉयफ्रेंड तुझा का माझा गं? म्हणत धरल्या एकमेकींच्या झिंझ्या; तुंबळ हाणामारी'जिल्हा प्रशासनाच्या हातात काहीही नाही. तुमचे जे निवेदन आहे ते दिले जाईल, पण, तुम्ही मला दोन वर्षांपूर्वी का भेटला नाही. तुमच्या मागणीचा विचार होईल, पण ते लागू होईल की नाही, याबद्दल शंका आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना द्या, त्याचा पाठपुरावा मी करेन', असं आश्वासनही उदयनराजे आंदोलकांना दिलं.
Published by:sachin Salve
First published: