आधारवाडी जेलमध्ये घुसला कोरोना? डॉन बोस्को स्कूल बनली दुसरी बंदीशाळा!

आधारवाडी जेलमध्ये घुसला कोरोना? डॉन बोस्को स्कूल बनली दुसरी बंदीशाळा!

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे.

  • Share this:

कल्याण, 31 मे: मुंबईसह ठाणे जिल्ह्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कल्याणमधील आधारवाडी जेलमध्येही कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जेल प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

नवीन कैद्यांना याच परिसरातील डॉन बोस्को स्कूलमध्ये पाठवण्यात येत आहे. स्कूलमध्ये कैद्यासाठी पर्यायी जेलची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉन बोस्को स्कूलमध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा....मुंबईत अवघ्या दीड-दोन तासांत 7 रुग्णांचा मृत्यू, नर्सनं दिली धक्कादायक माहिती

पहिल्या लॉकडाऊनच्या दरम्यान जेलमधील येण्या-जाण्यावर निर्बंध घातले आहेत. मात्र शहरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यातील गुन्हेगारांना नियमित कारागृहात धाडले जात असून बाहेरून येणाऱ्या कैद्यामुळे कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नवीन कैद्यांची व्यवस्था जेल बाहेरच करण्याच्या निर्णय आधारवाडी जेल प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दाटीवाटीने भरलेल्या आधारवाडी जेलमधील काही कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली असली तरी अद्याप 800 हून अधिक कैदी आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावराचे नियम पाळणे गरजेचे असून जेलमधील कैद्याची संख्या कमी केल्याखेरीज सुरक्षित वावराचे नियम पाळणे शक्य नसल्यामुळे काही कैद्याची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे.

हेही वाचा..मजुराच्या जेवणात आढळला विंचू, क्वारंटाइन सेंटरमधला अनागोंदी कारभार

मात्र, तरीही जेलमधील कैद्याची संख्या फारशी कमी झालेली नाही. त्यातच नव्याने येणाऱ्या कैद्यामुळे जेलमधील कैद्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती असल्यामुळे या कैद्याच्या सुरक्षेसाठी नव्याने कारागृहात धाडल्या जाणाऱ्या कैद्यांची जेलजवळील डॉन बोस्को स्कूलमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

First published: May 31, 2020, 1:30 PM IST

ताज्या बातम्या