मन सुन्न करणारी बातमी, त्याने जग पाहण्याआधीच आईसह सोडला जीव!

मन सुन्न करणारी बातमी, त्याने जग पाहण्याआधीच आईसह सोडला जीव!

ही महिला कोरोनाबाधित असल्याने तिला उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले होते.

  • Share this:

उस्मानाबाद, 17 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा आणखी वाढत चालला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे एका 8 महिन्याच्या गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची मन्न सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मंगळवार हा धोक्याचा वार ठरला. एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात राहणाऱ्या या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे उपचारासाठी या महिलेला लातूर येथे पाठवण्यात आले होते. परंतु,  उपचार सुरू असताना या महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

DEPRESSION मध्ये असलेल्या व्यक्ती का व्यक्त होत नाहीत? तज्ज्ञांनी दिलं कारण

तर दुसरीकडे  जिल्ह्यात 4 कोरोना रुग्णाची भर पडली असून कोरोनाचा आकडा 150 च्या पार गेला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी येथील 1, तुळजापूर तालुक्यातील सलगरा व मसला असे 2 व उमरगा तालुक्यातील बेटजवळगा येथील 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. वाणेवाडीचा रुग्ण हा पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कात होता तर बेटजवळगा येथील रुग्ण मुंबई येथून आला आहे.

तुळजापूर तालुक्यातील दोन्ही रुग्ण हे पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील होते अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या 153 झाली असून त्यापैकी 116 जण बरे झाले आहेत तर 31 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना योद्धांच्या मदतीला SMART WATCH; रुग्णाजवळ न जाता डॉक्टरांना मिळणार माहिती

जिल्ह्यात कोरोनाचे 153 रुग्ण असून त्यात सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद तालुका 57, तुळजापूर 13, उमरगा 17,लोहारा 8, कळंब 35, वाशी 4, भूम 5 व परंडा तालुक्यात 15 रुग्ण सापडले आहेत.

तर तालुक्यातील 42, तुळजापूर 9, उमरगा 15, लोहारा 2, कळंब 34, भूम 1 व परंडा तालुक्यातील 13 रुग्ण बरे झाले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील 5 जण तर उमरगा तालुक्यातील 1 असे जिल्ह्यात आतापर्यंत सहा जण कोरोनामुळे मयत झाले आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: June 17, 2020, 9:10 AM IST
Tags: corona

ताज्या बातम्या