2 आठवडे, 2 जिल्हे; आता पश्चिम महाराष्ट्राने वाढवलं राज्यासह केंद्राचं टेन्शन

2 आठवडे, 2 जिल्हे; आता पश्चिम महाराष्ट्राने वाढवलं राज्यासह केंद्राचं टेन्शन

Coronavirus In Maharashtra : मुंबई, ठाणे, नाशिकहून कोरोनाने आता पश्चिम महाराष्ट्राकडे कूच केली आहे. याबाबाबत केंद्राने अलर्ट जारी केला आहे.

  • Share this:

मुंबई, 07 मे : कोरोनाविरोधी लढ्यात महाराष्ट्राला (Coronavirus cases in Maharashtra) एकिकडे दिलासा मिळत असतानाच दुसरीकडे चिंता वाढली आहे. सर्वाधिक कोरोना प्रकरणं असलेल्या जिल्ह्यातील कोरोना प्रकरणं नियंत्रित करण्यात महाराष्ट्राला यश मिळताना दिसत आहे. पण त्याचवेळी दुसऱ्या जिल्ह्यांनी मात्र चिंता वाढवली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा रिपोर्ट जारी केला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं कमी झाली आहेत. पण दुसऱ्या दोन जिल्ह्यांमध्ये प्रकरणं वाढली आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक नाही तर आता पश्चिम महाराष्ट्राने टेन्शन वाढवलं आहे. या ठिकाणी  सातारा (Coronavirus cases in Satara) आणि सोलापूरमध्ये कोरोनाची (Coronavirus cases in solapur) प्रकरणं वाढू लागली आहे.

सोलापुरातील गेल्या दोन आठवड्यांतील नवे कोरोना रुग्ण

25 एप्रिल - 2044 रुग्ण

26 एप्रिल - 1537 रुग्ण

27 एप्रिल - 1390 रुग्ण

28 एप्रिल - 1878 रुग्ण

29 एप्रिल - 2242 रुग्ण

30 एप्रिल - 2486 रुग्ण

1 मे – 2233 रूग्ण

2 मे – 1878 रूग्ण

3 मे – 1777 रूग्ण

4 मे – 2009 रूग्ण

5 मे – 1993 रूग्ण

6 मे - 2117 रुग्ण

हे वाचा - 

सर्वाधिक कोरोना केसेस असलेल्या मुंबई, ठाणे, नाशिकचाही समावेश आहे. यासोबतच लातूर, औरंगाबाद, भंडारा, जळगाव, नांदेड या ठिकाणचीही कोरोना केसेस कमी झाले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिकहून कोरोनाने आता पश्चिम महाराष्ट्राकडे कूच केली आहे. याबाबाबत केंद्राने अलर्ट जारी केला आहे.

एकंदर महाराष्ट्राचा विचार करता. देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या राज्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. 12 राज्यांमध्ये एक लाखांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहे.

पण तरी महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी म्हणजे राज्यातील कोरोना प्रकरणं स्थिरावली आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना ब्रेक मिळाला असून गेल्या काही दिवसांत रुग्ण घटत असल्याचं केंद्राने सांगितलं आहे. राज्याच्या कोरोना रुग्णांचा आलेख घसरता आहे.

राज्यातील बाधितांच्या संख्येने 62 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी  राज्यात 62,194 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात सध्या एकूण 6,39,075 सक्रिय रुग्ण आहेत.  63,842 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 42,27,940 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) हे 85.54 टक्के इतके झाले आहे. राज्यातील मृत्यू दर 1.49 टक्के इतका झाला आहे.

Published by: Priya Lad
First published: May 7, 2021, 6:01 PM IST

ताज्या बातम्या