कोरोना झाल्यानंतरही तू जिवंत कशी? 'सुजान' नागरिकांचा महिलेच्या कुटुंबावर बहिष्कार

कोरोना झाल्यानंतरही तू जिवंत कशी? 'सुजान' नागरिकांचा महिलेच्या कुटुंबावर बहिष्कार

एवढंच नाहीतर काही लोकं चक्क रस्ताच बदलतात. गावातून ऑटोमध्ये जायला निघाले की, सहप्रवासी या महिलेला पाहून दुसऱ्या ऑटोमध्ये बसतात.

  • Share this:

नांदगाव, 07 जुलै :  अमरावती जिल्ह्यापासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगाव पेठ येथील कोरोनामुक्त महिलेच्या परिवारावर काही लोकांनी अप्रत्यक्षरित्या बहिष्कार टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

दीड महिन्यांपूर्वी या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. पण उपचाराअंती ही महिला  कोरोनातून मुक्त झाली आहे. मात्र, गावकऱ्यांच्या बहिष्कृतपणाला या महिलेला सामोरे जावे लागत आहे.

चिंताजनक! कोरोना रुग्णांच्या संख्येत मुंबईने चीनलाही टाकले मागे

कामानिमित्त सदर महिला गावात गेली की, लोक त्यांना टोमणे मारतात, 'कोरोना झाल्यानंतरही कशी जिवंत आहे' म्हणून हेटाळणी करतात. एवढंच नाहीतर काही लोकं चक्क रस्ताच बदलतात. गावातून ऑटोमध्ये जायला निघाले की, सहप्रवासी या महिलेला पाहून दुसऱ्या ऑटोमध्ये बसतात. या महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना या बहिष्कृत भावनेचा दररोज सामना करावा लागत आहे.

एकीकडे सरकार 'रुग्णांशी नव्हे, तर रोगाशी लढा' अशी जाहिरात करत असतांना जनजागृतीच्या अभावाने नागरिक मात्र, या थराला पोहचले असून प्रशासनाने ही बाब गंभीरतेनं घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. वेळीच या घटनांची दखल घेण्यात आली नाही तर मानसिकरित्या खचलेल्या महिलेच्या आयुष्यात अंधार शिरल्याशिवाय राहणार नाही.

भर पावसात सुरू होते पोल दुरुस्तीचे काम,वायरमॅनचा अचानक गेला तोल आणि..,पाहा VIDEO

ग्रामीण भागात शासनाने याबाबत जागरूकता दाखविणे आवश्यक आहे. याबाबत नांदगांव पेठ पोलिसांना देखील माहिती देण्यात आली आहे.

तथापी, कोरोनाचा रुग्ण बरा झाल्यानंतर दुसऱ्यांना त्याचा संसर्ग होत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र शिरसाट यांनी सांगितले.

संपादन - सचिन साळवे

Published by: sachin Salve
First published: July 7, 2020, 1:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या