मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर घसरला; म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर घसरला; म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे कोरोना रुग्ण वाढीचा दर हा घसरला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

राज्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे कोरोना रुग्ण वाढीचा दर हा घसरला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

राज्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे कोरोना रुग्ण वाढीचा दर हा घसरला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मुंबई, 19 मे: महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा (Covid patient) दर घसरला असून रुग्णवाढीच्या दरात महाराष्ट्र (Maharashtra) 34व्या क्रमांकावर आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) 90.69 टक्के इतके आहे ही राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. याच दरम्यान राज्यात म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, या सर्व रुग्णांवर उपयार सुरू आहेत आणि मोफत उपचार (Free treatment on mucormycosis) देण्याच्या संदर्भातही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार

राज्यात म्युकरमायकोसिस आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणारा खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडू नये यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

म्युकरमायकोसिसचे राज्यात साधारणत: 800 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसिसचे 500 रुग्ण बरे झाले आहेत. म्युकरमायकोसिससाठी लागणाऱ्या इंजेक्शनची कमतरता आहे. आपण 1 लाख 90 हजार इंजेक्शन ऑर्डर दिल्या आहेत, पण कंपनी पुरवठा करत नाही. केंद्र सरकारने यावर संपूर्ण ताबा घेतला आहे. इंजेक्शनचा अधिकार राज्यांना द्या. म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन महाराष्ट्राला द्या. राज्याला म्युकरमायकोसिसच्या दीड ते दोन लाख इंजेक्शनची आवश्यकता आहे. केंद्र सरकारसोबत सातत्याने संपर्कात आहोत आणि पंतप्रधान मोदींकडे विषय मांडणार आहोत असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

राज्यातील रुग्णवाढीचा दर घसरला

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर घसरला आहे. रुग्णवाढीच्या दरात महाराष्ट्र 34व्या क्रमांकावर आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.69 टक्के इतके झाले आहे. राज्यात 4 लाख 19 हजार 727 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या फक्त दुसऱ्या डोसचं लसीकरण सुरू असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर घसरला आह

रुग्णवाढीच्या दरात महाराष्ट्र 34व्या क्रमांकावर

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.69 टक्के

राज्यात 4 लाख 19 हजार 727 सक्रिय रुग्ण आहेत

सध्या फक्त दुसऱ्या डोसचं लसीकरण सुरू

महाराष्ट्रमध्ये अडीच लाख चाचण्या होत आहेत

2 कोटी 31 लास लस दिल्या आहेत

महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर

कोविशिल्ड 2 लाख आणि कॉव्हाक्सिन 3 लाख डोस उपलब्ध आहेत

ते फक्त दुसऱ्या डोस साठी वापरायचे आहेत

5 कोटी लस च ग्लोबल टेंडर काढलं आहे

अद्याप कोणी टेंडर भरले नाहीत

25 तारखेपर्यंत कंपन्यांना निविधा भरता येणार आहेत

केंद्र सरकारच्या काही परवानगी लागणार आहेत

ब्लॅक फंगसचे 800 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत

म्युकरमायकोसिसचे राज्यात साधारणत: 800 रुग्णांवर उपचार सुरू

म्युकरमायकोसिसचे 500 रुग्ण बरे झाले

यासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची कमतरता आहे

आपण 1 लाख 90 हजार इंजेक्शन ऑर्डर दिल्या आहेत

पण कंपनी पुरवठा करत नाही

केंद्र सरकारने यावर सम्पूर्ण ताबा घेतला आहे

इंजेक्शनचा अधिकार राज्यांना द्या

म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन महाराष्ट्राला द्या

राज्याला म्युकरमायकोसिसच्या दीड ते दोन लाख इंजेक्शनची आवश्यकता

केंद्र सरकारसोबत सातत्याने संपर्कात आहोत

पंतप्रधान मोदींकडे विषय मांडणार

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार होणार

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार होणार

First published:

Tags: Coronavirus, Mumbai, Rajesh tope