पुण्यातील ग्रीन झोनमध्येही घुसला कोरोना, 'हे' ठरलं सर्वात मोठं कारण

पुण्यातील ग्रीन झोनमध्येही घुसला कोरोना, 'हे' ठरलं सर्वात मोठं कारण

पुण्यातील काही भाग गेल्या दोन महिन्यांपासून दूर राहिला होता. मात्र आता तिथेही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

  • Share this:

रायचंद शिंदे, जुन्नर, 26 मे : "ग्रीन झोन" आणि मुळातच "सॅनिटाईज" तालुका अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. लॉकडाऊन नंतर तब्ब्ल 2 महिन्यांनी कोरोना चोर पावलांनी तालुक्यात दाखल झाला आणि तालुक्यातील प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोन महिने एकही रुग्ण न सापडल्या या परिसरात चालू आठवड्यात 7रुग्ण सापडले आहे. त्यामुळे सॅनिटाईज तालुका अशी ओळख असलेल्या तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.

कशामुळे आली जुंदरीवर ही वेळ?

जुन्नरची ओळख बागायती तालुका असल्याने सुरवाती पासूनच "जुंदरी माणूस" अशी ओळख निर्माण करत जुन्नरमधून मुंबईला नोकरी, व्यवसाय आणि फ्रुट व फुल मार्केटला स्थिरावली. जुन्नरचा सरासरी घरटी एक तरी माणूस मुंबईत आहे. ही मंडळी पहिले 3 लॉकडाऊन जाहीर झाल्यावर गावी आली नाहीत. मात्र मुंबईत कोरोनाचे वातावरण तापल्यानंतर अखेर चौथ्या लॉकडाऊननंतर झपाट्याने ही मंडळी गावी परतली. लॉकडाऊन शिथिल केल्याने पुण्या-मुंबईकडून वैध-अवैध मार्गाने जुन्नरकर मंडळी कोरोना बाधित क्षेत्रातून रात्री-अपरात्री कुटुंबासह गावी आली.

दोन महिन्यांपासून पोलीस, महसूल प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नाने तालुक्यात कोरोनाचा अटकाव झाला होता. स्थानिक तरुण मंडळी गावोगावचे लोकप्रतिनिधी यांनी परप्रांतीय मजुरांची सुरक्षितरित्या त्यांच्या घरी पाठवणी केली.पोलिसांच्या चेक पोस्टमुळे पुणे-मुंबईतील जुन्नरकर गावी येण्यास निर्बंध आले होते, तथापि गेल्या आठवड्यात तालुक्यात मोठ्या संख्येने नागरिक आले आणि जुन्नरची चिंता वाढली. आलेली काही मंडळी क्वारंटाइन करूनही गावात मनमानी फिरत असतात आणि याचमुळे जुन्नरच्या गावखेड्यातही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने गावाकडची मंडळी धास्तावली आहेत.

तसेच जुन्नर तालुका मुंबई,पुणे,ठाणे आणि नगर या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर येतो. त्यामुळे इतरही खूप मंडळी याच परिसरातून प्रवास करून गेली.गावी आलेली मंडळी रात्री अपरात्री घरी येत आहेत. नव्याने आलेल्या लोकांबद्दल ग्रामस्थांची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. यातली काही मंडळी शाळेत क्वारन्टाइन होत नाहीत. त्यामुळे स्थानिक गावकरी, प्रशासन आणि मुंबईकर नागरिकांचे क्वारन्टाइन होण्यावरून वाद होऊ लागले आहेत.

काय आहे सॅनिटाईज जुन्नरची खरी ओळख?

कोरोनामुळे सॅनिटायझर हा शब्द घराघरात माहीत झाला आहे. मात्र या शब्दाची खरी ओळख जुन्नरला दिली ती भारताचे आरोग्य केंद्र असं म्हणणारे आणि स्वातंत्रानंतर भारतातचं स्थायिक झालेले भारताचे पहिले वनसंरक्षक डॉ. अलेक्झांडर गिबसन यांनी. ही गोष्ट अनेकांना माहीत देखील नाही. मात्र त्यांच्या आठवणी आजही जुन्नर तालुक्यात ताज्या आहेत. "इथल्या स्वच्छ आणि मोकळ्या हवेत श्वसनाचे आजार बरे होतात," हे डॉ गिबसन यांचे निरीक्षण. सह्याद्रीच्या रांगात पसरलेल्या या तालुक्यात स्वच्छ,आल्हाददायक वातावरण असल्याने डॉ गिबसन यांनी आपल्या साहित्यात सॅनिटाईज तालुका अशी नोंद केली आहे.

या सर्व गोष्टींमुळे ब्रिटीश काळात ते ब्रिटिशांना जुन्नरला जाऊन आराम करायचा सल्ला देत. जंगलाला आपलसं करुन झाडे, झुडपांच्या संवर्धनासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेले भारताचे पहिले वनसंरक्षक डॉ. अलेक्झांडर गिबसन यांच्या कर्तृत्व स्मृतींचा वारसा त्यांनीच उभारलेल्या जुन्नर तालुक्यातील हिवरे बुद्रुक येथील गिबसन पार्कमध्ये संग्रहित करण्यात आला आहे. हिवरे बुद्रुक येथील वनविभागाच्या ताब्यात वनरक्षक डॉ अलेक्झांडर गिबसन यांचे स्मृतिस्थळ आहे .याच आधारावर जुन्नर तालुका पर्यटन तालुका जाहीर झाला.

नेमके कोण होते डॉ अलेक्झांडर गिबसन?

देशाचे पहिले वनरक्षक, निष्णात वैद्यकीय सर्जन,झाडाझुडपांवर प्रेम करणारा आणि वृक्ष संवर्धनासाठी संपुर्ण आयुष्य व्यथीत करणारा हा ब्रिटिश अधिकारी होता. ईस्ट इंडिया कंपनीसोबत भारतात आल्यानंतर 1946 मध्ये ब्रिटिशांनी त्यांची भारताचे पहिले वनसंरक्षक म्हणून नियुक्ती केली होती. भारतातील जंगल वाचविण्यासाठी वनसंरक्षक डॉ. अलेक्झांडर गिबसन यांनी भिल्ल लोकांना आपलेसे करत हजारो एकरवरील वृक्षवल्ली जपण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे डॉ गिबसन यांचे कार्य जगभरात कौतुकास्पद समजले गेले.

दख्खनच्या पठारावरील जंगल वाचविण्यासाठी स्वतः घोडेस्वारी करून डॉ.गिबसन यांनी शेकडो मैलांचा प्रवास केला होता. जुन्नर तालुक्यातील हिवरे येथे वनस्पती उद्यानात उभारलेल्या 180 वृक्षांच्या रेखाकृती साकारून त्यांचा पुस्तकी ठेवा आजही स्कॉटलंडच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये पहावयास उपलब्ध आहे. डॉ गिब्सन यांचा संपुर्ण कार्यकाळाची सर्व माहिती हिवरे येथील संग्रहालयात लावण्यात आली आहे. 150 एकर जागेपैकी पाच एकर जागेवर वनस्पतींच्या लागवडी डॉ गिबसन यांच्या काळात झाल्या होत्या. त्यांनी लावलेला महोगनी वृक्ष आजही येथे पहायला मिळतो, तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ गिब्सन यांच्या पत्नीच्या संकल्पनेतून एक स्मुर्तीशिल्प स्तंभही उभारण्यात आला आहे. आपल्या वनस्पती संशोधनाबरोबर आवड म्हणून गिबसन यांनी तीन कुत्री पाळली होती. टीपू, लेझी,आणि ओयन नावे असलेल्या या कुत्र्यांच्या स्मृतीदेखील येथे समाधीस्थळाच्या रुपात आजही उपलब्ध आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 26, 2020, 11:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading