मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन, 1410 गावात ग्राउंड झिरो स्कॅनिंग

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन, 1410 गावात ग्राउंड झिरो स्कॅनिंग

प्रत्येक घरातील क्षयरोग, कर्करोग, हृदयरोग, दमा,अस्थमा, श्वसनाचे आजार डायबिटीज, मधुमेह असलेल्या रुग्णांचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे.

प्रत्येक घरातील क्षयरोग, कर्करोग, हृदयरोग, दमा,अस्थमा, श्वसनाचे आजार डायबिटीज, मधुमेह असलेल्या रुग्णांचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे.

प्रत्येक घरातील क्षयरोग, कर्करोग, हृदयरोग, दमा,अस्थमा, श्वसनाचे आजार डायबिटीज, मधुमेह असलेल्या रुग्णांचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे.

बीड, 26 जून: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाने 1410 गावात ग्राउंड झिरो स्कॅनिगची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील गावखेड्यातील व वस्ती तांड्यावरील प्रत्येक घरातील क्षयरोग, कर्करोग, हृदयरोग, दमा,अस्थमा, श्वसनाचे आजार डायबिटीज, मधुमेह असलेल्या रुग्णांचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. यात तब्बल साडेपाच हजार अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्या या ग्राम पातळीवरील महत्वाची कामगिरी पार पाडत आहेत.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील आशा रुग्णावर जिल्हा आरोग्य प्रशासनाची करडी नजर राहणार आहेत, या माध्यमातून कोरोनाला रोखण्याचा नवा ॲक्शन प्लॅन तयार केला आहे.

हेही वाचा...धक्कादायक! सुशांतसिंह राजपूतनंतर आता या 16 वर्षीय TikTok स्टारनं केली आत्महत्या

बीड जिल्ह्यात कोरोनाला रोखणात बीड जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच वयोवृद्ध व जुन्या आजाराच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने नव्याने आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये जिल्हाभरातील सर्वात डायबिटीज शुगर दमा श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांचे संरक्षण केले जात आहेत. यासाठी प्रत्येक गाव पातळीवर काम करणारे कोरोना फ्रंट वॉरियर अंगणवाडी सेविका आणि आशा कर्मचारी या प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील आजारासंदर्भात माहिती जमा करून जिल्हा आरोग्य विभागाकडे देत आहेत. यामुळे गाव खेड्यातून कोणाला हद्दपार करण्यासाठी मदत होणार आहे.

या मोहिमेमध्ये जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सात लाख कुटुंबांची पहिल्या टप्प्यात तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी महिला बालकल्याण आरोग्य विभाग व अंगणवाडी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित यांचा आकडा शंभरी पार केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून ही मोहीम हाती घेतल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण चंद्रशेखर केकान यांनी सांगितले. कोरोनापासून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा..मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दोन महिलांसह पाच जणांचा जागेवरच मृत्यू

कोरोना रुग्णांमध्ये जुन्या आजाराने ग्रासलेल्याचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने या पासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या मोहिमेबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच 1410 गावात होणाऱ्या सर्वेक्षनातून जिल्हाभरातील सर्व रुग्णांचा अहवाल आरोग्य विभागाकडे राहणार आहे, त्यामुळे उपचार करण्यास गती मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

First published:

Tags: Corona symptoms, Corona virus, Coronavirus, Coronavirus india