धोक्याची घंटा : मुंबईत अवघ्या 12 तासांत कोरोनाचे 143 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील आकड्यातही मोठी वाढ

धोक्याची घंटा : मुंबईत अवघ्या 12 तासांत कोरोनाचे 143 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील आकड्यातही मोठी वाढ

  • Share this:

मुंबई, 9 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत असून आता कोरोना रुग्णांची संख्या 1297 एवढी झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे राजधानी मुंबईत अवघ्या 12 तासांत 143 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या माहितीनुसार, पुणे, औरंगाबाद येथे प्रत्येकी 3, कल्याण डोंबिवलीध्येही 4 रुग्णांची वाढ झाली आहे. तर मीरा-भाईंदर, वसई-विरार, सिंधुदुर्ग, ठाणे, यवतमाळ या भागात प्रत्येकी एक असे एकूण 162 रुग्ण 12 तासांत वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता एकूण 1297 झाला आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातही मोठी वाढ

मुंबईतील प्रतिबंधक क्षेत्रांची यादी आता 381 झाली आहे. याआधी पालिकेने दिलेल्या आकडा हा 241 जागांचा होता. याचा अर्थ असा होतोय कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मुंबईत वाढू लागले आहेत. जिथे कोरोनाबाधित रुग्ण आढळतात अशा भागाला सील केलं जातो. तिथे ये-जा पूर्णपणे बंद केली जाते. जीवनावश्यक वस्तूसाठीही लोकांना फार काळ बाहेर पडू दिलं जात नाही. त्याला प्रतिबंधित क्षेत्र असं म्हटलं जातं.

मुंबईतील हलगर्जीपणानंतर कारवाई

मुंबई महापालिका ई वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांची बदली करण्यात आली आङे. त्यांच्या जागी मृदुला अंडे(Ande) यांची नियुक्ती करण्यात आली. ससाणे यांच्या भागातील

वॉक हार्ट रुग्णालयाचा हलगर्जीपणामुळे 53 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये 33 परिचारिका आणि 20 इतर कर्मचारी होते. वेळीच सहाययक आयुक्तांनी कारवाई केली नाही, प्रतिबंधात्मक क्षेत्र केले नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2020 12:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading