• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Coronavirus Update : मुंबई, पुण्याची नवीन रुग्णसंख्या घटली; पण Covid मृत्यूंचा आकडा वाढताच, पाहा latest news

Coronavirus Update : मुंबई, पुण्याची नवीन रुग्णसंख्या घटली; पण Covid मृत्यूंचा आकडा वाढताच, पाहा latest news

गेल्या काही महिन्यातली सर्वात कमी मृत्यूसंख्या सोमवारी नोंदली गेली होती. त्यात पुन्हा आज वाढ झाल्याचं दिसतं. गेल्या 24 तासांत 430 COVID मृत्यू नोंदले गेले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 29 सप्टेंबर : महाराष्ट्रात Coronavius च्या नवीन रुग्णांची संख्या गेल्या दोन- तीन दिवसात थोडी कमी येत आहे. बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही नवीन रुग्णांपेक्षा अधिक असल्याचे रिकव्हरी रेटही वाढला आहे. पण त्याचबरोबर COVID-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा मात्र पुन्हा एकदा वाढल्याचं दिसतं. गेल्या काही महिन्यातली सर्वात कमी मृत्यूसंख्या सोमवारी नोंदली गेली होती. त्यात पुन्हा आज वाढ झाल्याचं दिसतं. गेल्या 24 तासांत 430 COVID मृत्यू नोंदले गेले आहेत. दिवसभरात 19,212 कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आलं तर  14,976 नवीन रुग्ण दाखल झाले. राज्यात आतापर्यंत 10,69,159 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पण अद्याप  2,60,363 रुग्ण उपचाराधीन आहेत. उपचाराधीन रुग्णांची (Active patients) सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे, त्यानंतर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यांचा क्रमांक आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे या तीनही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत नवीन रुग्ण सापडण्याचा वेग तुलनेने कमी झाला आहे. मुंबईत पुन्हा एकदा रुग्णवाढीचा दर आटोक्यात ठेवण्यात यश आलं आहे. 29 सप्टेंबरची आरोग्य विभागाने दिलेली आकडेवारी अॅक्टिव्ह रुग्ण  - 2,60,363 24  तासांतली वाढ - 14,976 24 तासांतले मृत्यू - 430 एकूण रुग्णसंख्या - 1366129 एकूण मृत्यू - 36181 मृत्यूदर - 2.65% रिकव्हरी रेट - 78.26% आकडेवारीमागचं भीषण वास्तव गेल्या आठवड्याच News18 ने दिलेल्या विश्लेषणानुसार, भारतात होणारे अनेक मृत्यू हे घरी होत असतात. रुग्णालयात दाखल करेपर्यंतची व्यवस्थाच नसल्याने उपचारांअभावीच हे मृत्यू नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदले जातात. त्यामुळे अशा रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येत नसून अशा अनेक रुग्णांच्या मृत्यूची नोंद देखील होत नाही. त्याचबरोबर अनेक रुग्णालयांची आरोग्य मंत्रालयाच्या मेडिकल सर्टिफिकेट विभागाकडे नोंद नसल्याने या ठिकाणी होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांची नोंदच घेतली जात नाही. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मृत्यूंची नोंद होत नसून दिल्लीमध्ये केवळ 63 टक्के रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचीच नोंद होत असते. त्यामुळे आपण विचार करू शकतो की, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड यांसारख्या अविकसित राज्यांमध्ये काय परिस्थिती होत असेल. या ठिकाणी केवळ 35 टक्के रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद होत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद होत नसल्यामुळे खरा डेटा समोर येत नाही. कोरोनच्या सर्व मृत रुग्णांची नोंद नाही कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात टेस्ट होत नसल्यामुळे (Covid test) अनेक मृत्यू कशामुळे झाले आहेत हे समोर येत नाही. मृत्यू झालेल्या रुग्णांची कोरोना चाचणी होत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे की नाही हे समजत नाही. अशा संदिग्ध अवस्थेतल्या रुग्णांचा आकडा बराच मोठा असू शकतो. त्यामुळे कोरोनाचा मृत्यूदर जेवढा कमी असल्याचं दाखवलं जातं, तेवढा तो खराच कमी आहे का याचा कोणताही ठोस पुरावा भारताच्या आरोग्य विभागाकडे नाही. भारतात सध्या कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र भारताची लोकसंख्या लक्षात घेता होणाऱ्या चाचण्या अजूनही फार कमी आहेत. या आकडेवारीचा विचार केला तर, दरदिवशी केवळ 10 लाख नागरिकांमागे केवळ एकाच व्यक्तीची टेस्ट केली जाते आहे. भारताशी तुलना केली तर अमेरिकेमध्ये 10 लाख लोकसंख्येमागे 150 टेस्ट तर ऑस्ट्रेलियामध्ये 156 टेस्ट करण्यात येत आहे. जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना बाधित आढळला आणि जर त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असल्यास (Comorbidity) तर त्याच्या मृत्यूची नोंद कोरोनाने झाल्याची होत नाही. त्यामुळे देखील भारतात मृत्यूदर कमी असल्याचे दिसून येत आहे.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published: