Home /News /maharashtra /

राज्यात गेल्या 24 तासांत नवे कोरोना रुग्ण झाले कमी; पण तरीही या कारणाने दिलासा नाही! पाहा ताजे Corona Updates

राज्यात गेल्या 24 तासांत नवे कोरोना रुग्ण झाले कमी; पण तरीही या कारणाने दिलासा नाही! पाहा ताजे Corona Updates

रुग्ण वाढीचा सरासरी दर देखील आता 0.33 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

रुग्ण वाढीचा सरासरी दर देखील आता 0.33 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

गेल्या आठवड्याभरात पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या 5 हजारांच्या आत नोंदली गेली. पण...

    मुंबई, 23 नोव्हेंबर : राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा आकडा (Maharashtra Corona updates) आज आठवड्याभरात पहिल्यांदाच थोडा कमी आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपेक्षा दैनंदिन नव्या रुग्णांची (Covid-19) संख्या थोडी कमी नोंदली गेली. सोमवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 4153 कोविड रुग्णांचं निदान झालं आहे. पण चाचण्यांची संख्या आणि रविवारी होणाऱ्या कमी चाचण्या गृहित धरता ही बातमी दिलासादायक आहे, असं मानता येणार नाही. राज्यात गेल्या 24 तासांत 30 कोरोना रुग्णांचा मृत्यू नोंदला गेला. त्यामुळे राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.61 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 16,54,793 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.74 % एवढं झालं आहे. कोरोनाचे महाराष्ट्रातले ताजे अपडेट्स - सोमवारी बऱ्याच दिवसात पहिल्यांदा नवीन रुग्णांची संख्या 5 हजारांच्या आत नोंदली गेली. - आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०२,८१,५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,८४,३६१ (१७.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. - सध्या राज्यात ५,१७,७११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,५२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील उपचाराधीन रुग्णसंख्या (Active patients) 81,902 आहेत. गेल्या महिन्यात कमी झालेली Covid रुग्णांची संख्या 18 नोव्हेंबरपासून वाढू लागली आहे. दररोज नव्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे.महाराष्ट्राचा कोरोनाचा आलेख उतरत होता, तो पुन्हा चढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबई, ठाणे परिसरातल्या शाळा सुरू होणार होत्या. त्या आता डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार नाहीत. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शाळा सुरू झाल्यात. पण कोरोना भयाने उपस्थिती कमी आहे. राज्यात अनेक पालक शाळा सुरू करण्याचा विरोध करीत आहेत. त्यामुळे अनेकजण अद्यापही आपल्या पाल्याला शाळेत पाठवित नसल्याचे दिसून आले. दरम्यान अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार हजेरी अजूनही 30 टक्के आहे. शनिवारपर्यंत 4700 हून अधिक शिक्षकांची कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली आहे. आणि 13 जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारचा मोठा निर्णय दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात येण्याच्या 72 तास आधी ही करोना चाचणी करावी लागेल.चाचणी निगेटीव्ह असेल तरच प्रवाशाला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. फोन नंबर, पत्त्यासह सर्व माहिती त्या प्रवाशाकडून घेतली जाईल. पुन्हा लॉकडाऊन? लॉकडाऊनबाबत ठाकरे सरकार "वेट ॲन्ड वॉच" या भूमिकेत असल्याची माहिती आहे. पुढच्या 15 दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यास सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं समजतं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या