मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोना व्हायरसनं निर्माण केलं देव आणि भक्तांमध्ये अंतर, साईबाबा, महालक्ष्मी मंदिर बंद

कोरोना व्हायरसनं निर्माण केलं देव आणि भक्तांमध्ये अंतर, साईबाबा, महालक्ष्मी मंदिर बंद

राज्यात कोरोना व्हायरसचे 39 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाय म्हणून राज्यातील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचे 39 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाय म्हणून राज्यातील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचे 39 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाय म्हणून राज्यातील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 17 मार्च: राज्यात कोरोना व्हायरसचे 39 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाय म्हणून राज्यातील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डितील साईबाबा मंदिर, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदीर, शेगाव येथील गजानन महाराज मंदिर, जेजुरी येथील खंडोबा मंदिर भक्तांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साई पालख्यांनाही बंदी साईबाबा मंदिराचे सीईओ या संदर्भात मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत. तसेच मुंबई आणि ठाण्यातून तसेच इतरही भागातून येणाऱ्या साई पालख्यांना थांबवण्यात येणार आहे. साई पालख्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आल्या असतील त्यांना तिथूनच परत जाण्यासंदर्भातही कळवण्यात येणार आहे. साईबाबा मंदिर बंद करण्यात आले तरी मंदिरातील साईबाबांची विधिवत पूजा मात्र सुरूच रहाणार आहे. तसेच साईबाबांचे लाईव्ह दर्शन टाटा स्काय वरती दाखवणयाची व्यवस्था देखील साईबाबा मंदिर न्यासाने घेतला आहे. हेही वाचा..पुण्यात आजपासून पुढचे 3 दिवस व्यापार बंद, या महत्त्वाच्या ठिकाणांवरही बंदी मध्यरात्रीपासून बंद अंबाबाईचं मंदिर कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराबाबत मंगळवारी बैठक संध्याकाळी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. आज मध्यरात्रीपासून मंदिर बंद होण्याची शक्यता आहे. कोरोनाबाबतचा धोका टाळण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी ही माहिती दिली आहे. संत गजानन महाराज मंदिर बंद कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने आता टोकाचं पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. बुलडाणाचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सायंकाळी शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान पत्र पाठवून श्रींचे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे मागील दोन दिवसांपासून मंदिर 20 मार्च ते 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर वायरल होते याबाबत संस्थानने मात्र या मेसेजला दुजोरा न देता भक्तांसाठी मंदिर सुरू राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थानला मंदिर बंद करण्यासंदर्भात आदेशित केले आहे. हेही वाचा..आनंदाची बातमी, कोरोनाला दूर ठेवण्यात महाराष्ट्रातील 442 जण ठरले यशस्वी! जेजुरी गडावर भाविकांना दर्शन बंदी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार तीर्थक्षेत्र जेजुरी गडावरील तसेच जुना गड कडेपठार गडावरील दर्शन आज मध्यरात्रीपासून 31 मार्च पर्यंत भाविकांसाठी बंद करण्यात आल्याचा निर्णय मार्तंड देव संस्थान आणि कडेपठार विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आला आहे. या संदर्भात जेजुरीत मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे व पदाधिकारी कडेपठार मंदिर कमिटीचे सचिव सदानंद बारभाई, ग्रामस्थ, मानकरी, पुजारी, सेवेकरी जेष्ठ नागरिक संघ यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. यावेळी पालिकेचे विरोधी पक्ष नेते जयदीप बारभाई, देवाचे मानकरी इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे,खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, सतीश कदम, नित्य वारकरी मंडळाचे कृष्णा कुदळे, बारा बलुतेदार संघटनेचे संतोष खोमणे माधव बारभाई, अनिल बारभाई, समीर मोरे, रमेश देशपांडे उपस्थित होते. हेही वाचा..पंढरपूरमध्ये कोरोनाग्रस्त देशातून आले 3 डॉक्टर, 14 दिवस व्यवसाय करण्यास बंदी जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे, भारतात ही प्रादुर्भाव वाढू लागला आहे हा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आज सर्वसमावेशक घटकांची एक संयुक्तिक बैठक घेऊन 31 मार्च पर्यंत भाविकांना दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात मंदिराची संपूर्ण स्वच्छता, परिसर स्वच्छता, त्याच बरोबर भाविक एकविरा पेस कंट्रोल चे किरण उघाडे यांच्याकडून संपूर्ण उद्यापासून मंदिरात पेस कंट्रोल केले जाणार असल्याची माहिती देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी दिली.
First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या