धुळे, 15 फेब्रुवारी : पोलीस दलाची प्रतिमा व अब्रू मलिन केल्या प्रकरणी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदखेडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमठाणा येथे दहशत मुक्त शिंदखेडा अभियानाअंतर्गत आयोजित सभे दरम्यान अनिल गोटे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. शरद पवार यांच्या जिल्हा दौऱ्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेल्या गृह खात्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
अनिल गोटे यांनी अनेक सभांमध्ये वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या वादग्रस्त विधानांची मोठी चर्चा असते. एकेकाळी भाजपमध्ये असलेले अनिल गोटे यांनी यापूर्वीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
हे ही वाचा-यंत्रणेत गोंधळ; कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेले कर्मचारी माघारी
फडणवीसांना टरबुज्या आणि चंद्रकांत पाटील यांना चंप्या हे नाव भाजपने दिलेली असून आपआपसातील द्वेषातून ही वारसं झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.