शिवरायांचा अवमान केलेल्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका, नगरसेवकपद केलं रद्द

शिवरायांचा अवमान केलेल्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका, नगरसेवकपद केलं रद्द

छिंदम भाजपचे उपमहापौर असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : अहमदनगरचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने मोठा दणका दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यानंतर श्रीपाद छिंदमविरोधात महाराष्ट्रभर अनेक आंदोलने करण्यात आली होती. दरम्यान श्रीपाद छिंदम प्रकरणी नगरविकास विभागाने 27 फेब्रुवारी रोजी सुनावणी केली, त्यावेळी छिंदम यांना हजर राहण्यास सांगितले होते. मात्र छिंदम हजर राहिला नाही. त्यामुळं आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात छिंदम याबाबत सुनावणी झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

श्रीपाद छिंदम हे भाजपकडून नगरचे उपमहापौर झाले होते. उपमहापौर असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले होते. त्याची राज्यभर चर्चा आणि वाद झाला होता. याच वादामुळे त्यांना उपमहापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यानंतर छिंदम पुन्हा अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आता त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आले.

का वादग्रस्त ठरले छिंदम?

छिंदम भाजपचे उपमहापौर असताना त्यांना हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. श्रीपाद छिंदमने बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी फोनवरून बोलताना शिवजयंतीविषयी अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. तसंच संबंधीत कर्मचाऱ्याने त्यांच्याविरुद्ध युनियनकडे तक्रारही केली होती. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच शिवसेनेनं छिंदमच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली आणि त्यांच्या कार्यालयाची मोडतोडही केली होती. शिवसेनेसोबतच संभाजी ब्रिगेडही छिंदम यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याने भाजपने शहरातलं वातावरण चिघळू नये, यासाठी छिंदमची तात्काळ उममहापौरपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. छिंदम यांनी त्याबद्दल माफीही मागितली होती. दरम्यान, या ऑडिओ क्लिपनंतर शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. श्रीकांत छिंदम यांच्याविरोधात राष्ट्रावादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. तर शिवसेनेनंही छिंदम यांचा पुतळा जाळून निषेधही केला होता.

First published: February 28, 2020, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading