खळबळजनक! राज्याच्या तिजोरीवर मोठा डल्ला, मुख्यमंत्र्यांच्या ड्रिम प्रोजेक्टमधून कंत्राटदारांनी लुटले 100 कोटी

खळबळजनक! राज्याच्या तिजोरीवर मोठा डल्ला, मुख्यमंत्र्यांच्या ड्रिम प्रोजेक्टमधून कंत्राटदारांनी लुटले 100 कोटी

जमिनीतून 20 लाख ब्रास मुरूम चोरला असून त्याची किंमत जवळ्पास शंभर कोटी आहे. अशी माहिती कोझी कंपनीचे तक्रारकर्ता निलेश सिंग यांनी दिली आहे.

  • Share this:

यवतमाळ, 26 ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार आणि उपकंत्राटदार बेकायदेशीर मुरूम उत्खनन करत असल्याचा प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे. या प्रकरणात ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही मुख्य कंत्राटदार कंपनी आणि तिची उपकंत्राटदार एमपी कन्स्ट्रक्शने हैद्राबादच्या कोझी प्रॉपर्टीजच्या केळझर इथल्या तब्बल एकशे तीन एकर जमिनीततील शेकडो कोटींचा मुरूम चोरून नेल्याचं समोर आलं आहे. ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा अधिकारी, उपकंत्राटदार कंपनी एमपी कन्स्ट्रक्शन यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे 59 किमी बांधकाम कंत्राट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिळाले आहेत. एकूण 3 हजार 220  कोटींचं हे काम असून 59 किमीचा टप्पा वर्धा जिल्ह्यात आहे. कोझी प्रॉपर्टीजची वर्धा जिल्ह्याच्या केळझर आणि गणेशपूर इथे एक हजार एकर जमीन असून समृद्धी महामार्गाचा जवळपास 1.50 किमीचा भाग या जमिनीतून जातो.

ही जमीन वर्धा जिल्ह्यातील सेलू आणि सिंदी या दोन पोलीस स्टेशनअंतर्गत येते. यापैकी 63 एकर जमीन सेलू तर 40 एकर सिंदी पोलीस स्टेशन अंतर्गत येते. या चोरीची तक्रार कोझी प्रॉपर्टीजने जिल्हाधिकारी आणि ठाणेदार सेलू पोलीस स्टेशन इथे 30 जुलैला केली होती. मात्र, त्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जमिनीतून 20 लाख ब्रास मुरूम चोरला असून त्याची किंमत जवळ्पास शंभर कोटी आहे. अशी माहिती कोझी कंपनीचे तक्रारकर्ता निलेश सिंग यांनी दिली आहे.

इतर बातम्या - शाळेतच सुरू होते मुख्याधापकांचे शिक्षिकांसोबत अश्लील चाळे, PHOTOS व्हायरल

समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री यांचा प्रोजेक्ट असल्याने कोणावरच कारवाई होणार नाही. मात्र, शेतकऱ्याचं या कंपन्यांनीने मोठं नुकसान केलं आहे. यास जबाबदार कोण असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

इतर बातम्या - विधानसभेत राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करू, पंकजा मुंडेंचा निर्धार

कोझी प्रॉपर्टीचे निलेश सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा अधिकारी, उपकंत्राटदार कंपनी एमपी कन्स्ट्रक्शन सेलू यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मात्र अजून कुणालाही अटक करण्यात आली नाही. तर या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती सेलू पोलीस स्थानकातील प्रल्हाद काटकर यांनी दिली आहे.

SPECIAL REPORT : सोनं अचानक इतकं महाग का झालं?

Published by: Renuka Dhaybar
First published: August 26, 2019, 8:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading