खा.सातवांच्या मारहाणीच्या निषेधार्थ हिंगोलीत तोडफोड आणि भाजप कार्यालयावर हल्ला

खा.सातवांच्या मारहाणीच्या निषेधार्थ हिंगोलीत तोडफोड आणि भाजप कार्यालयावर हल्ला

औंढा नागनाथ येथे बसच्या काचा फोडल्या, मोदींचा पुतळा जाळला आणि भाजप कार्यालयावर हल्ला करुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.

  • Share this:

03 डिसेंबर: खासदार राजीव सातव यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यात  औंढा नागनाथ येथे बसच्या काचा फोडल्या,  मोदींचा पुतळा जाळला आणि भाजप कार्यालयावर हल्ला करुन  काँग्रेस कार्यकर्त्यांनी  निषेध केला आहे.

गुजरात येथे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना गुजरात पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे पडसाद हिंगोली जिल्ह्यात उमटले. जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक करुन काचा फोडल्या. संतप्त झालेल्या काँग्रेसच्या 5-7 कार्यकर्त्यांनी औंढा बस स्थानकात उभ्या असलेल्या बसच्या काचा फोडून निषेध व्यक्त केला. खासदार राजीव सातव यांना गुजरात येथे अटक व मारहाण झाल्याबद्दल औंढा ते लोहारा जाणाऱ्या बसच्या बसस्थानकामध्ये काचा फोडल्याने प्रवाशांमध्ये तारांबळ उडाली. कार्यकर्ते इथेच थांबले नाही तर नरेंद्र मोदी यांचा पुतळा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळून भाजप कार्यालयावर हल्ला करुन कार्यालयाची तोडफोड केली . गुजरात सरकार दंडेलशाही करुन आवाज दाबण्याचा प्रकार करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. बस फोडल्याप्रकरणी पोलिस घटनास्थळी पोहोचले असून अजून कोणावर कार्रवाई करण्यात आलेली नाही.

First published: December 3, 2017, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading