नांदेड महापालिकेत काँग्रेसचं वर्चस्व; 73 जागांवर विजय

नांदेड महापालिकेत काँग्रेसचं वर्चस्व; 73 जागांवर विजय

81 पैकी 73 जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. तर भाजपला केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागतं आहे. यामधील 2 उमेदवार हे शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले आहेत. तर आता कॉँग्रेसला महापालिकेत विरोधीपक्षही नाही

  • Share this:

नांदेड, 12 ऑक्टोबर: संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी निर्विवाद वर्चस्व कायम ठेवलं आहे. खासदार अशोक चव्हाणांच्या नेतृत्त्वात नांदेड वाघाळा महापालिकेत, काँग्रेसने 73 जागा मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे.

81 पैकी 73 जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. तर भाजपला केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागतं आहे. यामधील 2 उमेदवार हे शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले आहेत. तर आता कॉँग्रेसला महापालिकेत विरोधीपक्षही नाही. विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी विरोधी पक्षाकडे किमान 9 नगरसेवक आवश्यक आहे. नांदेडमध्ये दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष असलेल्या भाजपकडे 6 नगरसेवक आहेत. तर एमआयएमला आपलं खातंही या निवडणुकीत उघडता आलेलं नाही.  2012 साली एमआयएमला 11 जागांवर यश मिळालं होतं. यावेळी मात्र त्यांचा दारूण पराभव झाला आहे.

सत्तेत असलेल्या भाजपनं मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेते मैदानात उतरवले होते. मोठमोठे दावेही केले होते. आश्वासनांचा पाऊसही पाडला होता. चिखलीकरांना गळाला लावलं. पण एवढं करूनही मतदारांनी काँग्रेसचा हात काही सोडला नाही.गेल्या काही दिवसात राज्यातल्या नाराज नेत्यांनी चव्हाणांविरोधात दिल्लीत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. पण या विजयानं चव्हाणांचं दिल्लीतलं वजन कायम राहाणार आहे.

लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सगळीकडे जिंकत सुटलेला भाजपचा वारू रोखणं हे विरोधाकांसमोरचं मोठं आव्हान आहे. नांदेडमध्ये चव्हाणांनी हा वारू रोखून आपली जादू कायम ठेवलीय तर मुख्यमंत्र्यांच्या पदरात बऱ्याच काळानं अपयश टाकलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 09:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading