राजकारणात भुकंप: भाजपला सगळ्यात मोठा धक्का, काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत

राजकारणात भुकंप: भाजपला सगळ्यात मोठा धक्का, काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत

सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार असून यासंदर्भात राष्ट्रवादीला पत्र पाठवणार असल्याची चर्चा या बैठकीमध्ये सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची माहिती एका मराठी वृत्त वाहिणीकडून देण्यात आली आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा आणि आमदारांचा जयपूरमल्या बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेच्या घडामोडींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिल्यानंतर आता इतर पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याची चिन्ह आहेत. एकीकडे संजर राऊत यांनीही आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस आपला शत्रू नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे.

सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार असून यासंदर्भात राष्ट्रवादीला पत्र पाठवणार असल्याची चर्चा या बैठकीमध्ये सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे जर असं झालं तर हा भाजपसाठी सगळ्यात मोठा धक्का आहे. यासगळ्यात काँग्रेसचे नेता आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवले आणि त्यावेळी जर शिवसेनेने पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल, असे मिलिंद देवरा म्हणाले आहेत.

दरम्यान, 13 व्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार स्थापण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. मोठा पक्ष असलेल्या भाजपची सत्ता स्थापन करण्याची तयारी आहे का, असे विचारणा करणारे पत्र राज्यपालांनी शनिवारी भाजपला पाठवले आहे. त्यानंतर राजकीय हलचालींना वेग आला आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपामधील मुख्यमंत्रीपदाचा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. यामध्ये आता काँग्रेस पक्षानं उडी घेतली आहे.

भाजपा सत्तास्थापन करण्यात अपयशी ठरल्यास राज्यपालांनी महाआघाडीला निमंत्रण द्यायला हवे. त्यावेळी शिवसेनेने पाठिंबा दिल्यास आम्ही सरकार स्थापन करू, असं वक्तव्य काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.यावेळी बोलताना देवरा म्हणाले की, जर राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवलं आणि त्यावेळी जर शिवसेनेनं पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या या मोठ्या वक्तव्यानंतर राज्यकीय चर्चेला उधाण आलं आहे.

इतर बातम्या - महाराष्ट्रात राजकीय चित्र बदलणार, काँग्रेसबाबत संजय राऊत म्हणाले...

‘राज्यपालांनी भाजपकडे बहुमत आहे की नाही याची खात्री करायला हवी’

भाजपाची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. तसंच राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवारांच्या उपस्थितीत १२ नोव्हेंबरला मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असल्याची देखील मलिक यांनी महिती दिली.

राज्यात सत्तास्थापनेसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियमाप्रमाणे राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला निमंत्रण दिलं आहे. याचं पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी मत व्यक्त केलं आहे. ‘राज्यपालांनी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही याची खात्री करून घ्यायला हवी’, असं नवाब मलिक म्हणाले.

इतर बातम्या - भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला.. संजय राऊतांनी पुन्हा सोडले टीकास्त्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल

पुढे ते असं म्हणाले की, राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिलं आहे. जी प्रक्रिया आता सुरू झाली ती अगोदर होऊ शकत होती. घोडेबाजार सुरू होऊ नये यासाठी राज्यपालांनी लक्ष दिलं पाहिजे. भाजपाची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. पटलावर सरकार पडल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याविरोधात मतदान केलं आणि पटलावर सरकार पडलं तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करू शकतो, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

इतर बातम्या - चाकूचे 3 वार आणि मैत्रीचा 'दी एन्ड', दोस्तानेच केली तरुणाची निर्घृण हत्या

शरद पवारांच्या उपस्थितीत १२ नोव्हेंबरला मुंबईत बैठक

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक १२ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही आमदार नवाब मलिक यांनी दिली. इतर बातम्या -

इतर बातम्या - दिल्लीची 'हवा' बिघडली.. शिवसेनेकडून भाजपची तुलना थेट 'हिटलर'शी

Published by: Renuka Dhaybar
First published: November 10, 2019, 11:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading