Home /News /maharashtra /

मुंडे बहीण-भावाच्या वादात तिसऱ्याचा लाभ, भाजप-राष्ट्रवादीच्या चढाओढीत काँग्रेसने मारली बाजी

मुंडे बहीण-भावाच्या वादात तिसऱ्याचा लाभ, भाजप-राष्ट्रवादीच्या चढाओढीत काँग्रेसने मारली बाजी

मुंडे बहीण-भावाच्या वादात तिसऱ्याचा लाभ, भाजप-राष्ट्रवादीच्या चढाओढीत काँग्रेसने मारली बाजी

मुंडे बहीण-भावाच्या वादात तिसऱ्याचा लाभ, भाजप-राष्ट्रवादीच्या चढाओढीत काँग्रेसने मारली बाजी

नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर अनेक ठिकाणी दिग्गजांना धक्का बसल्याचं दिसून आलं. तर बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायतीत बहीण-भावाच्या वादात तिसऱ्याला लाभ झाल्याचं दिसून येत आहे.

बीड, 27 जानेवारी : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी म्हण आपण ऐकली असेल मात्र बीड जिल्ह्यात (Beed district) याचा प्रत्यय आला आहे. नुकत्याच बीड जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर (Nagar Panchayat Election result) विजयाच्या आणि सत्ता स्थापनेच्या श्रेय वादावरून मुंडे बहीण- भावात जुंपली. याचाच फायदा घेत काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील (MP Rajanitai Patil) यांनी केज नगरपंचयातमध्ये (Kej Nagar Panchayat Election) बाजी मारत जनविकास आघाडी (Janvikas Aghadi) सोबत सता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. (Congress join hands with Janvikas Aghadi in Kej Nagar Panchayat) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या प्रतिष्ठेसाठी वाटेल ते करून सत्ता आणणार असा दावा केला जात होता. तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जनविकास आघाडी ही भाजपा पुरस्कृत आहे, केजमध्ये नगराध्यक्ष भाजपचा होणार अस जाहीर भाषणात म्हटलं होतं. या वक्तव्याला खुद्द जनविकास आघाडीचे प्रमुख हारून इनामदार यांनी विरोध दर्शवत कोणत्याही पक्षाची पुरस्कृत आघाडी नसून आमची केज शहर विकासाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली जनविकास आघाडी आहे. त्यामुळे भाजपा पुरस्कृत आघाडी हा दावा चुकीचा आहे असं हारून भाई इनामदार यांनी सांगितले. वाचा : काँग्रेसला भगदाड! महापौरांसह 27 नगरसेवकांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ स्थानिक राष्ट्रवादी ही गलिच्छ राजकारण करत आहे, केजच्या नागरिकांच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो असून खासदार रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास करून दाखवणार असल्याचा काँग्रेसचे आदित्य पाटील यांनी बोलून दाखवलं. महाविकास आघाडी सत्तेत जरी एकत्र असलो तरी स्थानिक विकासाच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादीला दूर ठेवलं आहे असं देखील आदित्य पाटील यांनी सांगितलं आहे. वाचा : सांगलीत भाजपचा लवकरच 'करेक्ट कार्यक्रम', 2 माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर! केज नगरपंचयात निवडणुकीत जनविकास आघाडी 8, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 3 तर एक अपक्ष असे उमेदवार निवडून आले होते. परंतु यामध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला होता. यात भाजपकडून आणि राष्ट्रवादी कडून दावे-प्रतिदावे केले जात होते. मात्र यावर आता पडदा पडला असून केजच्या विकासासाठी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनविकास परिवर्तन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आले आहे. त्यामुळे आता केज नगरपंचायतीत काँग्रेस आणि जनविकास परिवर्तन आघाडी सत्ता स्थापन करणार आहेत. आपलं गाव आपलं सरकार ही संकल्पना घेऊन आम्ही आता गावात विकास काम करू असेही यावेळी बोलताना काँग्रेस आणि जनविकास परिवर्तन आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Beed, BJP, Dhananjay munde, Pankaja munde

पुढील बातम्या