मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढणार, परळीमध्ये काँग्रेस मांडणार वेगळी चूल!

धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढणार, परळीमध्ये काँग्रेस मांडणार वेगळी चूल!

'परळी नगरपरिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, सामान्य परळीकर दहशतीखाली जगत असून यामध्ये भाजप तसंच राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व असून...'

'परळी नगरपरिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, सामान्य परळीकर दहशतीखाली जगत असून यामध्ये भाजप तसंच राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व असून...'

'परळी नगरपरिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, सामान्य परळीकर दहशतीखाली जगत असून यामध्ये भाजप तसंच राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व असून...'

बीड, 20 ऑगस्ट : राज्य सरकारने स्थानिक पातळीवरील निवडणुका (Local level elections) घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष मोर्चबांधणीला लागले आहे. पण, बीडमध्ये (beed) महाविकास आघाडीमध्ये (mva government) आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये कुरबुरी सुरू असल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसने (congress) स्वबळाचा नारा देत वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

परळी शहरांमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने आगामी परळी नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. परळी नगरपरिषद धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असून राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत एकत्रित असलेल्या दोन्ही पक्षांमधील स्थानिक कार्यकर्ते आमने-सामने येणार असल्याने समजूत कशी काढली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रात्री विचित्र आवाजांमुळे नवऱ्याला आली जाग; बायको गायब,CCTV पाहिला तर धक्का बसला

परळी राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित परळी शहर अध्यक्ष सय्यद हनिफ सय्यद करीम यांनी परळी शहरात पत्रकार परिषदेत आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'माझ्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाच्या वतीने आगामी काळात आम्ही नगर परिषदेच्या स्वतंत्र निवडणुका लढणार आहोत.'

'सद्या परळीमध्ये दहशदीचे वातावरण असून ते वातावरण चांगले करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. "परळी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची" अशी परळी आम्ही करण्यासाठी सदैव तात्पर  असल्याचे सय्यद हनिफ सय्यद करीम यांनी सांगितले.

स्वयंपाक करण्यावरून झाली भांडणं, हातोडा मारून घेतला ‘रुम पार्टनर’चा जीव

'परळी नगरपरिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, सामान्य परळीकर दहशतीखाली जगत असून यामध्ये भाजप तसंच राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व असून या ठिकाणी सामान्य जनतेला पोलीस स्टेशनला साधी तक्रार दाखल करण्यासाठी सुद्धा नेत्यांची परवानगी घ्यावी लागत असून अशा वातावरणात सर्व सामान्य माणूस आपले जीवन जगत आहे. हे वातावरण आम्हाला बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असंही ते म्हणाले.

First published:

Tags: Congress, Dhananjay munde