मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

SSR Case: चित्रपट निर्माता संदीप सिंहवरुन राजकारण तापलं, काँग्रेस-भाजपत जुंपली

SSR Case: चित्रपट निर्माता संदीप सिंहवरुन राजकारण तापलं, काँग्रेस-भाजपत जुंपली

बॉलिबूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide case) प्रकरण सीबीआयच्या हातात गेल्यानं तपासाला गती आली आहे.

बॉलिबूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide case) प्रकरण सीबीआयच्या हातात गेल्यानं तपासाला गती आली आहे.

बॉलिबूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide case) प्रकरण सीबीआयच्या हातात गेल्यानं तपासाला गती आली आहे.

मुंबई, 29 ऑगस्ट: बॉलिबूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide case)प्रकरण सीबीआयच्या हातात गेल्यानं तपासाला गती आली आहे. सीबीआयनं आपला तपास सुरू केला आहे. मात्र, या प्रकरणात चित्रपट निर्माता संदीप सिंह याचं नाव समोर आल्यानं राज्यातील राजकारण तापलं आहे. विशेष म्हणजे संदीप सिंह हा 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा निर्माता आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही संदीप सिंहचे फोटो आहेत. त्यामुळे संदीप सिंह यांचे भाजप कनेक्शन काय आहे? असा सवाल काँग्रेसनं केला आहे. त्यावरून आता संदीप सिंहवरून काँग्रेसविरूद्ध भाजप अशी जुंपली आहे. हेही वाचा..सुशांतसिंह प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण आता या प्रकरणात भाजप आमदार राम कदम यांनी उडी घेतली आहे. राम कदम यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले आहे. राम कदम यांनी सांगितलं की, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संदीप सिंह याच्यावरून भाजप नेत्यांवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. जनतेची दिशाभूल करणारे आहेत. सुशांतसिंह प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी 65 दिवस तपास केला. तेव्हा सरकारनं संदीप सिंहची चौकशी का नाही केली. गृहखातं देखील सरकारच्या ताब्यात आहे. मग त्यावेळी संदीप सिंहच काय तर त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करायला हवी होती. आणि आताही सरकारनं चौकशी केली तरी त्यांना कोण अडवत आहे. याचा अर्थ असा की, सरकारला कोणाची तरी पाठराखण करायची आहे. रियाचं आणि महाराष्ट्र सरकारचं काय नातं आहे.? रियाला तातडीनं पोलिस संरक्षण दिलं जातं, मात्र सुशांतच्या नातेवाईकांनी नाही. रियाला रेड कार्पेट ट्रिटमेंट मिळत, असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. काय म्हणाले होते सचिन सावंत? सुशांतसिंह प्रकरणात संदीप सिंहवरही मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप होत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चॅटवरुन ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर भाजपकडून सरकारवर हल्लाबोल सुरु आहे. त्यात काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी संदीप सिंहचे फडणवीसांसोबतचे फोटो शेअर करुन, भाजपच्या अँगलवरुनही चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती आहे, भाजप अँगल तपासून घ्यावा. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय संदीप सिंह यांची चौकशी करणार आहे.संदीप सिंहचं भाजप कनेक्शनही तपासावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. सचिन सावंतावर फडणवीसांचा पलटवार... देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांच्यावरही यावेळी निशाणा साधला. संदीप सिंह हे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो सिनेमा झाला त्याचेही निर्माते आहेत. एखाद्या कार्यक्रमात माझा त्यांच्यासोबत फोटो असेल, त्यावर राजकारण करण्यासारखं काहीही नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पोलिसांनी संदीप सिंह यांची चौकशी का केली नाही? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. हेही वाचा..दारू दुकानं खुली केली जात असतील तर मंदिरे का बंद? विखे पाटलांचा खोचक सवाल सचिन सावंत यांच्या अभ्यास कमी पडत आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी सावंतांना टोला लगावला. सावंत यांना विधान परिषदेवर जायचं आहे. त्यांना संधी मिळत नाही म्हणून ते सध्या निराश आहेत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
First published:

Tags: Sushant sing rajput, Sushant Singh Rajput

पुढील बातम्या