मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सरकार गेलं पण धुसफूस कायम, शिवसेनेच्या त्या निर्णयावर काँग्रेस प्रचंड नाराज

सरकार गेलं पण धुसफूस कायम, शिवसेनेच्या त्या निर्णयावर काँग्रेस प्रचंड नाराज

MahavikasAghadi Congress Unhappy with Shivsena

MahavikasAghadi Congress Unhappy with Shivsena

हाराष्ट्रातलं महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार गेलं असलं तरी त्यांच्यामधली अंतर्गत धुसफूस कायम आहे. शिवसेनेने (Shivsena) परस्पर घेतलेल्या निर्णयावर काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...
    जळगाव, 10 ऑगस्ट : महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार गेलं असलं तरी त्यांच्यामधली अंतर्गत धुसफूस कायम आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेने अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नावाची शिफारस केली. शिवसेनेच्या या निर्णयावर काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे तर विधानपरिषदेचं उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे, त्यामुळे विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळायला पाहिजे होतं, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. संख्याबळ पाहता जवळपास सगळेच समान आहेत, त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देणं आवश्यक आहे. याबाबत उद्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याची माहितीही थोरात यांनी दिली. दुर्दैवाने शिवसेनेकडून विचारणा झाली नाही, हा आमचा आक्षेप आहे. आम्ही जर मित्र आहोत तर एकमेकांशी बोललं पाहिजे, अशा शब्दांमध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. विधानपरिषदेमध्ये सध्या शिवसेनेकडे 12, काँग्रेसकडे 10 आणि राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत. यातल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदारकी सोडली आहे, पण विधिमंडळाच्या वेबसाईटवर अजूनही ठाकरे यांना आमदार दाखवण्यात येत आहे. तर शिवसेनेच्याच नीलम गोऱ्हे या उपसभापती आहेत. उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिला का नाही? कहाणीमध्ये नवा ट्विस्ट! दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ आज रात्री 8 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचा समावेश आहे. या भेटीमध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याबाबतचा मुद्दा चर्चीला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातलं सत्तांतर, राऊतांच्या अटकेवर मौन, राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रवादीचे नेते पहिल्यांदाच मातोश्रीवर!
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या