आमदार फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसने उचललं मोठं पाऊल

आमदार फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसने उचललं मोठं पाऊल

आमदार फोडाफोडीचं भय आता सर्वच पक्षांना आहे. काँग्रेसने यासाठी मोठं पाऊल उचलल्याची बातमी आहे.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. भाजपच्या 105 आमदार आणि अपक्षांची साथ सोडता अजित पवारांबरोबर नेमके कोण आणि किती आमदार भाजप सरकारमध्ये सामील होतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आमदार फोडाफोडीचं भय आता सर्वच पक्षांना आहे. काँग्रेसने यासाठी मोठं पाऊल उचलल्याची बातमी आहे. काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूर, भोपाळ किंवा मुंबईतच एखाद्या हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व आमदारांना आजच ठरलेल्या ठिकाणी रवाना करणार असं वृत्त आहे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यात सरकार भाजपचं असल्याने मुंबईचा पर्याय शक्यतो टाळला जाईल. मध्य प्रदेश किंवा राजस्थानमध्येच काँग्रेस आपल्या आमदारांना रवाना करेल, अशी शक्यता आहे. त्यातही जयपूरचा पर्याय सर्वात जवळचा असल्याचं वृत्त आहे.

दुपारी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अहमद पटेल यांनी सरकार बनवण्याची शक्यता अजून शिल्लक असल्याचं सांगितलं. "अजूनही आमचं सरकार येऊ शकतं, असं स्पष्ट करताना ते म्हणाले, "आमचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत."

"महाराष्ट्रात राजकीय कांड झालं आहे. आमच्याकडून झालेल्या विलंबामुळे नव्हे, तर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे हे कांड झालं आहे", असंही अहमद पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांमध्ये सत्तास्थापनेची बोलणी शेवटच्या टप्प्यात आलेली असतानाच भाजपने हा धक्का दिला. त्याविषयी बोलताना अहमद पटेल म्हणाले, "आमची कालची चर्चा चांगली झाली होती. भाजपने महाराष्ट्रात घाईघाईने शपथविधी उरकला. सरकारस्थापनेची ही रात्रीत केलेली घाई पाहूनच लक्षात येतं यात काळंबेरं आहे. हे सरकार कायद्याला धरून झालेलं नाही. आम्ही तिन्ही पक्ष मिळून फडणवीस सरकारचा पराभव करू."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2019 02:35 PM IST

ताज्या बातम्या