Home /News /maharashtra /

नाना पटोलेंचं नवं Tweet..! व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले...

नाना पटोलेंचं नवं Tweet..! व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress state president) नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे.

    मुंबई, 14 फेब्रुवारी: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress state president) नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. ट्विट करुन त्यांनी पंतप्रधान यांना महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा असं म्हटलं आहे. व्हिडिओ पोस्ट करुन त्यांनी हे ट्विट केलं आहे. नाना पटोले यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, आज उत्तर प्रदेशातील जनता मतदान करणार आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील नाते आई आणि मावशीचे आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा या नात्याचा अपमान केला आहे. हा अपमान लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश. काँग्रेस-भाजप आमनेसामने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेत भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला असा दावा करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपने (BJP) माफी मागावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे भाजपने माफी मागावी यासाठी नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज काँग्रेस भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 'सागर' (Sagar) या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहे. नाना पटोले यांनी स्वत: याबाबत घोषणा केली. पण त्यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रातील भाजप नेते देखील आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने खरंत हिंमत असेल तर फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाला येऊन दाखवावे, त्यांना भाजप कार्यकर्ते प्रत्युत्तर देतील, असा इशारा भाजप नेत्यांकडून देण्यात आला. प्रसाद लाड आक्रमक नाना पटोले यांनी फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन करण्याच्या घोषणेनंतर भाजप आमदार प्रसाद लाड आक्रमक झाले. त्यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत नाना पटोलेंना टोकाच्या शब्दांमध्ये प्रतिआव्हान दिलं. त्यांच्या त्या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे लोंढे यांनी प्रसाद लाड यांचा फडणवीसांच्या बंगल्यातील पाळीव आणि वॉचमन असा उल्लेख केला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात पेटला आहे. प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले? भाजप नेते प्रसाद लाड यांनी ट्विटरवर त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत त्यांना नाना पटोले यांना प्रतिआव्हान दिलं आहे. "नाना तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय. हिंमत असेल तर उद्या सकाळी दहा वाजता येऊनच दाखल. नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्हीदेखील भाजपवासी नाही! सागरवर तू ये पाहतो मी तू कसा जातो ते", असं प्रसाद लाड म्हणाले आहेत. या व्हिडीओसह त्यांनी ट्विटरवर नाना पटोलेंना इशारा दिला आहे. "अतीबोलघेवडेपणा बरा नाही नाना पटोले! तऱ्हेवाईक नाना पटोलेंनी सागर बंगल्याच्या जवळ तरी येऊन दाखवावे, मग बघूया, ते आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते आहे, आता जशास तसे उत्तर मिळेल", असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Nana Patole, Narendra modi

    पुढील बातम्या