मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी , डोंगर आणि हॉटेल; मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाना पटोलेंची खोचक टीका

शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी , डोंगर आणि हॉटेल; मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाना पटोलेंची खोचक टीका

फाईल फोटो

फाईल फोटो

खातेवाटपात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना महत्त्वाची जबाबादारी देण्यात आली आहे. विखे पाटलांना महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 14 ऑगस्ट : जून महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर राज्यात शिंदे गट-भाजपचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. नाना पटोलेंची जोरदार टीका - या खातेवाटपात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना महत्त्वाची जबाबादारी देण्यात आली आहे. विखे पाटलांना महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. यावरुन नाना पटोलेंनी शिंदे गटावर पुन्हा एकदा टीका केली आहे. 'फडणवीसांनी अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली..शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी , डोंगर आणि हॉटेल !', असे ट्विट करत त्यांनी सरकारवर टीका केली. कोणाला कोणती खाती? राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग इतक्या खात्यांची जबाबदारी आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या तुलनेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कमी खाती देण्यात आली आहेत. गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहे. इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत: 1) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास 2) सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय 3) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य 4) डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास 5) गिरीष महाजन - ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 6) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 7) दादा भुसे - बंदरे व खनिकर्म 8) संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन 9) सुरेश खाडे - कामगार 10) संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन 11) उदय सामंत - उद्योग 12) तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण 13) रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण 14) अब्दुल सत्तार - कृषी 15) दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा 16) अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण 17) शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क 18) मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
First published:

Tags: BJP, Eknath Shinde, Nana Patole

पुढील बातम्या