मुंबई, 18 जुलै: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज सिद्धिविनायक इथं दर्शन घेतलं. नवीन नियुक्त कार्याध्यक्ष ही यावेळी उपस्थित होते. महसूल मंत्री आणि भाजपचे नवीन प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. तिथे ते कार्यकर्त्यांनाही संबोधित करणार आहेत. दरम्यान त्यांच्या पक्षात कार्यकर्ते नाहीत म्हणून आमच्या पक्षातून लोक पळवत आहेत. अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.