मंत्रिमंडळातला फेरबदल म्हणजे भ्रष्टाचारावर पांघरून - अशोक चव्हाण

मंत्रिमंडळातला फेरबदल म्हणजे भ्रष्टाचारावर पांघरून - अशोक चव्हाण

फेरबदलातून सरकारचा चेहरा बदलल्याचे चित्र उभे करण्याची मुख्यमंत्र्यांची खटपट आहे. परंतु, निवडणुकीला जेमतेम ४ महिने असून, यातून काहीही हाती येणार नाही.

  • Share this:

मुंबई 16 जून :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलावर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केलीय. हा बदल निरर्थक असून त्यातून काहीही साध्य होणार नाही. फक्त राजकीय सोय आणि स्वार्थासाठी हा बदल करण्यात आल्याची टीका त्यांनी केलीय. यातून सरकारला काहीही साध्य होणार नाही असंही ते म्हणाले.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

भाजप-शिवसेना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षातील अपयश दडपण्याचा प्रयत्न आहे. पण कितीही प्रयत्न केले तरी हे सरकार भ्रष्टाचाराचे पाप आणि आपली निष्क्रियता झाकू शकणार नाही.

प्रकाश मेहता आणि इतर मंत्र्यांच्या भ्रष्टाचारामुळे सरकार अडचणीत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची कारवाई करण्याची इच्छाशक्ती नाही. त्यामुळेच प्रकाश मेहतांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्याऐवजी त्यांना केवळ मंत्रिमंडळातून बाजुला सारून या प्रकरणावर पडदा पाडण्याचा भाजप-शिवसेनेचा खटाटोप आहे.

फेरबदलातून सरकारचा चेहरा बदलल्याचे चित्र उभे करण्याची मुख्यमंत्र्यांची खटपट आहे. परंतु, निवडणुकीला जेमतेम ४ महिने असून, यातून काहीही हाती येणार नाही. हे फेरबदल निरर्थक असल्याची जाणीव उद्धव ठाकरेंनाही झाली असावी. त्यामुळेच त्यांनी शपथविधीऐवजी अयोध्येला जायला प्राधान्य दिले असावे

एखादा मंत्री आमदार नसल्यास ६ महिन्यात सदस्य होण्याची मुभा आहे. पण या सरकारचाच कार्यकाळ ४ महिन्यात संपेल. त्यामुळे आमदार नसलेले मंत्री सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत आमदार होऊ शकणार नाहीत. तरीही राजकीय सोय आणि तोडफोडीच्या राजकारणासाठी असे मंत्री करणे लोकशाहीच्या परंपरेचे उल्लंघन आहे.

First published: June 16, 2019, 11:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading