लढण्यापूर्वीच काँग्रेसच्या या सेनापतींनी मैदान सोडलं?

लढण्यापूर्वीच काँग्रेसच्या या सेनापतींनी मैदान सोडलं?

काँग्रेसचे राज्यातील सेनापती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही? याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

  • Share this:

मुंबई, 23 मार्च :  काँग्रेसनं देशासह राज्यातील उमेदवारांची नावं जाहीर केली. पण, त्यामध्ये राज्यातील काँग्रेसचे सेनापती समजले जाणारे संजय निरूपम, अशोक चव्हाण आणि राजीव  सातव यांच्या नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे या दिग्गाजांची नावं घोषित केव्हा करणार? सेनापतींनी लढण्यापूर्वीच मैदान सोडलं की काय? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम लोकसभेच्या मैदानात उतरणार की नाही यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. तर, राजीव सातव हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्यावर गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबतचा निर्णय राहुल गांधी यांच्यावरती सोपवला आहे. पण, अद्याप देखील याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या सर्व घडामोडी पाहता या तीन दिग्गजांना काँग्रेस मैदानात उतरवणार की नाही? हे पाहावं लागणार आहे.

नांदेडमध्ये भाजपचं अशोक चव्हाणांना आव्हान

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आता थेट आव्हान देण्याची तयारी भाजपनं केली आहे. त्यासाठी भाजपकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अशोक चव्हाण यांच्याविरोधात नांदेडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेससमोरचं आव्हान आणखीन कठीण होऊन बसलं आहे. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पण, भाजपनं आता थेट काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे यंदाच्या नांदेडमधील निकालाकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये काँटे की टक्कर होणार असून भाजपच्या या आव्हानाला आता अशोक चव्हाण कसे उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.

अमित शहा गांधीनगरमधून का उतरले निवडणुकीच्या रिंगणात?

लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

SPECIAL REPORT: सॅम पित्रोदांच्या विधानामुळे काँग्रेसची कोंडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 10:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading