बघता काय सामील व्हा, राष्ट्रवादीकडून काँग्रेसला 'ही' ऑफर

बघता काय सामील व्हा, राष्ट्रवादीकडून काँग्रेसला 'ही' ऑफर

सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमध्ये मोठ्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे रिट्रीत हॉटेलमध्ये आमदरांच्या बैठकीसाठी दाखल झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर : एकीकडे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात कलम 356 लागू करण्याची शिफारस केल्यानंतर त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी मिळाली आणि महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमध्ये मोठ्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे रिट्रीत हॉटेलमध्ये आमदरांच्या बैठकीसाठी दाखल झाले आहेत.

यामध्ये काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी सत्तेत यावं अशी ऑफर राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढली असली तरी आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये राजकारणातले किंग शरद पवार यांनी मोठा डाव खेळत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घ्यावं असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून शिवसेने समोर ठेवण्यात आला.

या सगळ्यात काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार आहे. पण जर असं झालं तर कुठेतरी राष्ट्रवादीची अडचण होऊ शकते. कोणत्याही चुकीच्या धोरणानंतर काँग्रेस आपला पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने सत्तेत यावं असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. यावर आता काँग्रेसच्या सोनिया गांधी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

इतर बातम्या - राष्ट्रपती राजवटीला शिवसेना देणार आव्हान, सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत भिडणार!

राष्ट्रपती राजवटीला शिवसेना देणार आव्हान, सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत भिडणार!

शिवसेनेच्यावतीने सध्या सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. मात्र, केंद्र सरकारने राष्ट्रपती शासन लागू केली. त्यामुळे आता शिवसेनेला नवीन याचिका दाखल करण्याची वेळ आली आहे. नवीन याचिका तयार करण्याचे काम कपिल सिब्बल आणि त्यांची चमू करीत असून लवकरच ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर ही याचिका भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या कडेही याचिका जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या - राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यातल्या 4 महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष

या सगळ्यामुळे आता नवनियुक्त सरन्यायाधीश काय निर्णय देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून ही मोठी घडामोड असणार आहे. शिवसेनेने वेळ वाढवून द्यायला नकार देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात आव्हान द्यायचं ठरवलं आहे. काँग्रेसचे नेते आणि वकील कपिल सिब्बल कोर्टात शिवसेनेची बाजू मांडतील, अशीही बातमी आहे. शिवसेना नेते अनिल परब यांनी याचिका दाखल केली आणि सुनील फर्नांडिस यांनी सेनेच्या वतीने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 12, 2019, 6:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading