महाशिवआघाडीचं ठरलं! 'या' 5 मुद्द्यांच्या आधारे चालणार सरकार

महाशिवआघाडीचं ठरलं! 'या' 5 मुद्द्यांच्या आधारे चालणार सरकार

काँग्रेसने शिवसेनेसमोर काही अटी ठेवल्याचीही माहिती आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला सत्तापेच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ऐतिहासिक आघाडीचं सत्तासमीकरण जुळताना पाहायला मिळत आहे. मात्र सरकार स्थापनेनंतर विचारधारेच्या मुद्द्यावरून कोंडी होऊ नये म्हणून काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. यातूनच काँग्रेसने शिवसेनेसमोर काही अटी ठेवल्याचीही माहिती आहे.

काँग्रेस आपल्या प्रतिमेबद्दल चिंताग्रस्त असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच शिवसेनेचं कडवट हिंदुत्व रोखणार कसं, असा काँग्रेससमोर प्रश्न आहे. कारण राम मंदिर, नागरिकता संशोधन विधेयक, कलम 370 या मुद्द्यांवर काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद असलेल्याचं याआधी दिसून आलं आहे. त्यामुळेच भविष्यात या मुद्द्यांवरून कोंडी होऊ नये म्हणून महाराष्ट्रात सत्तास्थापन करताना काँग्रेसने काही अटी ठेवल्या माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मांडलेल्या मुद्द्यांचा संभाव्य महाशिवआघाडीच्या सरकारवर प्रभाव असण्याची शक्यता आहे.

1. नव्या युतीने धर्मनिरपेक्ष या शब्दावर जोर दिला पाहिजे, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे.

2. सरकार स्थापन करताना कोणताही जातीय अजेंडा असू नये.

3. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सांगितले की ते खरे उदारमतवादी पक्ष आहेत.

4. समान कृती कार्यक्रमामध्ये सर्व पक्षांचे जाहीरनामा समाविष्ट केले जातील

5. संयुक्त समित प्रत्येक पक्षाने जिंकलेल्या जागांच्या आधारे पोर्टफोलिओ वाटप करण्याचा निर्णय घेईल.

पुढच्या 36 तासात सरकार स्थापनेचा तिढा सुटणार?

राज्यात सत्ता स्थापनेसाठी वेगान हालचाली सुरू झाल्या आहेत. बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत एकमतानं काही अटींवर शिवसेनेला पाठिंबा देण्यावर एकमत झालं मात्र तरीही आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सकाळी 10 वाजता स्वतंत्र बैठक तर दुपारी 2 वाजता संयुक्त बैठक पार पडणार आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकारात्मक बैठक झाली असून सेनेच्या नेत्यांच्या संपर्कात आहोत, असं स्पष्ट केलं आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात संपूर्ण चित्र उद्या (22 नोव्हेंबर)संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार असल्याचंही ते म्हणाले. लवकरच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं स्थिर सरकार येईल अशी काँग्रेसकडून सांगितलं जात आहे.

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मोदी आणि पवारांच्या भेटीत काय घडलं? पाहा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: November 21, 2019, 9:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading