PHOTO: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ-पाटील यांचं निधन; वयाच्या 101 वर्षी घेतला अखेरचा श्वास

महाराष्ट्राच्या राजकारणात सात दशकाहून अधिक काळापासून सक्रीय असलेला प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ नेते कालवश.

  • Share this:

राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे मध्यरात्री 2 वाजता राहत्या घरी निधन झालं. ते 101 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी 4 वाजता संगमनेर इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची दादा या नावाने एक वेगळी ओळख होती. पाटबंधारे मंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, राज्यमंत्रिपदांवर होते. काँग्रेसकडून त्यांनी 1962 ते 1980 अशा चार विधानसभा निवडणुका संगमनेर मतदारसंघातून जिंकल्या होत्या. 20 वर्ष ते आमदार होते. 1980साली त्यांनी शेवटची निवडणूक लढवून ती जिंकली आणि 1985 साली राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतली. महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये त्यांनी पहिलं मंत्रिपद भूषवलं होतं.

महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची दादा या नावाने एक वेगळी ओळख होती. पाटबंधारे मंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, राज्यमंत्रिपदांवर होते.
काँग्रेसकडून त्यांनी 1962 ते 1980 अशा चार विधानसभा निवडणुका संगमनेर मतदारसंघातून जिंकल्या होत्या. 20 वर्ष ते आमदार होते. 1980साली त्यांनी शेवटची निवडणूक लढवून ती जिंकली आणि 1985 साली राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतली. महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये त्यांनी पहिलं मंत्रिपद भूषवलं होतं.

वयाच्या 91व्या वर्षात त्यांनी पुस्तके लिहिली. अंतरीचे धावे, गुलामगिरी, धिंड लोकशाहिची, गांधीजी असते तर..., लष्करी विलखिती पाकिस्तान अशी त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत.खताळ-पाटील हे स्वत: एक सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सेनानी आहेत.

भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रीय सहभागी होते. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलनात त्यांनी भाग घेतला. बी. जे. खताळ हे व्यावसायाने वकील होते. त्यांचा गांधीजींच्या चले जाव चळवळीत मोलाचा सहभाग होता.

मराठा बोर्डिंग,बहुजन शिक्षण समाज, संगमनेर सहकारी साखर कारखाना उभारण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. जिल्ह्यातील पाझर तलाव,धरणे त्यांच्या प्रयत्नातून झाले. तालुक्यातील निळवंडे धरण त्यांच्यामुळे मार्गी लागले. कोल्हापूरचे दुधगंगा-वेदगंगा, सांगलीचे चांदोली-नांदोली, अप्पर वर्धा, नांदेडचं विष्णूपुरी राहुरीच्या मुळा धरणाचं काम मार्गी लावण्यात त्यांचा सहभाग होता.

Loading...

कमालिचे तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक नेता अशी त्यांची वेगळी ओळख होती. महाराष्ट्र राज्य सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2019 08:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...