काय म्हणाले अशोक चव्हाण? वाढती महागाई, अन्नधान्यावरील जीएसटी, बेरोजगारी आणि 'अग्निपथ' योजनेविरूद्ध आज राजभवनावर काँग्रेस पक्षाची निदर्शने होणार होती. मात्र पोलिसांनी त्यापूर्वीच प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले, असं ट्वीट अशोक चव्हाण यांनी केलं, पण त्यांनी यात थेट भाजपवर निशाणा साधण्याचं टाळलं आहे. या आंदोलनानंतर मुंबईमध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेच्या व्यासपीठावर काँग्रेसचे इतर नेते होते, पण अशोक चव्हाण दिसले नाहीत. डीपीही बदलला नाही आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना सोशल मीडिया अकाऊंटच्या डीपीवर देशाचा तिरंगा ठेवण्याचं आवाहन केलं. पंतप्रधानांच्या या आवाहनाला काँग्रेसने नेहरूंचा तिरंग्यासोबतचा फोटो डीपीला ठेवून प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या देशभरातल्या नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहरूंचा तिरंगा असलेला फोटो ठेवला आहे. महाराष्ट्रातले काँग्रेस नेतेही याला अपवाद नाहीत, पण अशोक चव्हाण यांनी मात्र डीपी बदलला नाही. मी काँग्रेसमध्येच मागच्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार या चर्चा जोरात सुरू आहेत, पण आपण असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, एवढीच प्रतिक्रिया दिली आणि भविष्यातल्या रणनितीबाबतचा संभ्रम कायम ठेवला. अशोक चव्हाणांसह काँग्रेस आमदारांना नोटीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे 11 आमदार विधिमंडळात उशीरा पोहोचले, त्यामुळे त्यांना मतदानामध्ये सहभागी होता आलं नाही. काँग्रेसच्या या आमदारांमध्ये अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर, झिशान सिद्दीकी, राजू आवळे, मोहन हंबर्डे, कुणाल पाटील, माधवराव जवळगावकर आणि शिरिष चौधरी यांचा समावेश होता. विश्वासदर्शक ठरावावेळी मतदानाला उपस्थित न राहिल्यामुळे काँग्रेसने या आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीवरून अशोक चव्हाण नाराज असल्याचं बोललं जात आहे.वाढती महागाई, अन्नधान्यावरील जीएसटी, बेरोजगारी आणि 'अग्निपथ' योजनेविरूद्ध आज राजभवनावर काँग्रेस पक्षाची निदर्शने होणार होती. मात्र पोलिसांनी त्यापूर्वीच प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.#महंगाई_पर_हल्ला_बोल pic.twitter.com/OnDDepUMti
— Ashok Chavan (@AshokChavanINC) August 5, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: अशोक चव्हाणCongress