तब्बल 3 दशकांनंतर रायकीय वैरत्त्व संपवून कराडचे बाबा-काका पुन्हा एकत्र

तब्बल 3 दशकांनंतर रायकीय वैरत्त्व संपवून कराडचे बाबा-काका पुन्हा एकत्र

  • Share this:

कराड, 6 नोव्हेंबर: संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वैरत्त्वामुळे गाजलेले कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर (Vilaskaka Patil Undalkar)हे दोन्ही नेते तब्बल तीन दशकांनी पुन्हा एकत्र आले आहेत. पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील यांच्यातील राजकीय वैरत्त्व संपुष्ठात आलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कराडमध्ये आयोजित पक्षाच्या मेळाव्यात विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील ( Udaysinh Vilasrao Patil) काँग्रेसमध्ये जोरदार प्रवेश केला आहे.

हेही वाचा..मोठी बातमी! या सरकारी कंपन्या पुढील 9 महिन्यात बंद होण्याची शक्यता

कराड हा काँग्रेसचा गड मानला जातो. मात्र, एवढी वर्षे या गडाला 2 किल्लेदार होते. ते म्हणजे विलासकाका उंडाळकर आता 82 वर्षांचे आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण 74 वर्षांचे आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे विलासराव पाटील-उंडाळकर यांना उद्देशून म्हणाले की, आपण दोघे आपापसात भांडत राहिलो. त्यामुळे जातीयवादी भाजप पक्षानं फायदा उचलला. आपल्यातल्या मतभेदामुळे काँग्रेस पक्षाचंही मोठं नुकसान झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी कबूल केलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साम दाम दंड भेद वापरून काँग्रेसला संपवायचा निर्णय घेतला आहे. भारतात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. जातीयवादी पक्षाच्या आसऱ्याला जाणार नाही. यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो असल्याची ग्वाही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षाची पुन्हा बळकट करण्यासाठी एकत्र आलो आहे. यामुळे कराड तालुक्याची राजकीय दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. असं सांगताना चव्हाण यांनी दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या आठवणींला उजाळा दिला.

हेही वाचा..महिला बॅंकरच्या पतीचं मुंबईत 'बिहार स्टाईल' अपहरण करून खाडीत फेकलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल..

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच संकट 21 दिवसांत संपवणार असल्याचं म्हटलं होतं. त्याच काय झालं? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मोदींनी हट्टी पणाने निर्णय घेतले. देशाची अर्थव्यवस्था 25 टक्क्यांनी घसरली आहे. मोदींना सरकारी उदयोग विकल्याशिवाय देश चालवता येणार नाही. भारतात अशा हुकूमशाहाला लोक जास्त दिवस थारा देणार नाहीत. आघाडी सरकार स्थापन होण्यामागे माझा खारीचा वाटा आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: November 6, 2020, 6:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या