गांधी जयंतीला सेवाग्राममध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक, सोनिया गांधीही राहणार उपस्थित

गांधी जयंतीला सेवाग्राममध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक, सोनिया गांधीही राहणार उपस्थित

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सेवाग्राम, वर्धा इथं आपल्या कार्यकारणी समितीची बैठक आयोजित करण्याच्या विचारात काँग्रेस आहे.

  • Share this:

नागपूर, 22 सप्टेंबर : महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सेवाग्राम, वर्धा इथं आपल्या कार्यकारणी समितीची बैठक आयोजित करण्याच्या विचारात काँग्रेस आहे. निवडणुकांच्या तोंडावर जनसंपर्क वाढवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर मोर्चाचं देखील आयोजन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

महात्मा गांधी 1936 मध्ये नागपूरच्या जवळ असलेल्या सेवाग्राम इथे राहत होते. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीचं औचित्य साधून काँग्रेस या ठिकाणी बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या मॅरेथॉन बैठकीनंतर काँग्रेस शांततेत मोर्चा काढणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

गांधींच्या जयंती दिवशी आम्ही एक बैठक आयोजित करण्याचा विचार करत आहोत. सेवाग्रामधून काढलेला हा मोर्चा काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नेण्यात येईल असं कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी सांगितलं आहे.

यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देखील या बैठकीत सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस लोकांपर्यंत पोहचण्याचा आणि निधी उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.

सावधान! बँकेची ही माहिती शेअर केल्यास लाखोंच नुकसान, SBI चा इशारा

First published: September 22, 2018, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading