• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • सरकारच्या कारभारावर काँग्रेस नाराज! मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी मांडल्याची सूत्रांची माहिती

सरकारच्या कारभारावर काँग्रेस नाराज! मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी मांडल्याची सूत्रांची माहिती

राज्यामध्ये कोरोनाची स्थिती आणि सरकारच्या विरोधात जाणारे काही मुद्दे पाहिले असता सरकारमधील मित्रपक्षांतही काही खटके उडत असल्याचं दिसत आहे.

 • Share this:
  मुंबई, 03 एप्रिल : राज्यामध्ये कोरोनाची स्थिती आणि सरकारच्या विरोधात जाणारे काही मुद्दे पाहिले असता सरकारमधील मित्रपक्षांतही खटके उडत असल्याचं दिसत आहे. त्यात संजय राऊत यांच्यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. तसेच राज्य सरकारच्या कारभारावरही काँग्रेस नाराज असल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने ही नाराजी मुख्यमंत्र्यांसमोर बोलून दाखवली असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना युपीएनं अध्यक्षपदं सोपवावं असं म्हटलं होतं. संजय राऊत यांनी वारंवार अशा प्रकारचं विधान केलं आहे. यावरूनच संजय राऊत यांच्या विरोधात काँग्रेसची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. आता पुन्हा एकदा या मुद्द्यानं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली असून महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी यासंदर्भातील नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर बोलूनही दाखवली असल्याची माहिती मिळाली आहे. वाचा - टीका करणं सोपं, उद्धव ठाकरे होणं कठीण! आव्हाडांचा फडणवीसांना टोला संजय राऊत यांच्या विधानाबरोबरच एकूणच राज्य सरकारच्या कारभाराविषयीही काँग्रेस समाधानी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतही काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. या सर्वच मुद्द्यांवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी सचिन वाझे, परमबीर सिंह, गृहमंत्र्यांवरील आरोप सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणांवर चर्चा केली. या सर्वांमुळं राज्य सरकारची बदनामी होत असल्याचा सूर काँग्रेस नेत्यांच्या या बैठकीत उमटला असल्याचं समजते. वाचा -शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी नवाब मलिक यांनी दिली दिलासादायक माहिती संजय राऊत यांनी अनेकदा शरद पवार यांनी युपीएचं अध्यक्ष व्हायला हवं असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून अनेक दिवस राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातही वातावरण तापलेलं होतं. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी संजय राऊत यांनाही सुनावलं होतं. संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दांतही नेत्यांनी टीका केली होती. पण आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत काँग्रेसने याची तक्रार केल्याची माहिती मिळत आहे.
  Published by:News18 Desk
  First published: