मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

mlc election : काँग्रेसने खेळला भाजपचाच डाव, बावनकुळेंविरोधात त्यांचाच माणूस उतरवला!

mlc election : काँग्रेसने खेळला भाजपचाच डाव, बावनकुळेंविरोधात त्यांचाच माणूस उतरवला!

 महाविकास आघाडीच्या नीतीला छेद देत भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपची युती झाली आहे.

महाविकास आघाडीच्या नीतीला छेद देत भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपची युती झाली आहे.

छोटू भोयर हे भाजपमधून आल्याने ते भाजपच्या मतांना सुरुंग लागेल या आशेने काँग्रेसने त्यांना रिंगणात उतरवले आहे.

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी (maharashtra Legislative Council Elections) कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवार आता मैदानात उतरले आहे. भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात डॉ रवींद्र भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेस हायकमांडाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. रात्री उशिरा नागपूरमधून डॉ रवींद्र भोयर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्याआधी दुपारी काँग्रेसही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कोल्हापूरमधून सतेज पाटील (satej patil) यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर धुळ्यातून गौरव वानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तर चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे. विदर्भात ओबीसी समाजाला नाराज करता येणार नाही, हे डोळ्यासमोर ठेवून बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  त्यामुळे विनोद तावडे नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील भाजप कडून पुनर्वसन होताना दिसत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडून ही निवडणूक लढायला कोणीही फारसे उत्सुक नसल्याने शेवटल्या क्षणाला भाजप नगरसेवक छोटू(रवींद्र) भोयर यांना काँग्रेसमध्ये आयात करून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अभिनेत्री मैत्रिणी होऊ शकत नाहीत पण सई-प्रियाचा हा फोटो पाहून विसराल ..

छोटू भोयर हे भाजपमधून आल्याने ते भाजपच्या मतांना सुरुंग लागेल या आशेने काँग्रेसने त्यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे छोटू भोयर हे भाजपच्या किती मातांना फोडून निवडून आपल्या बाजूने वाळवितात त्यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.

विशेष म्हणजे, भाजपकडे निर्णायक 70 ते 75 मतांची आघाडी असल्याने काँग्रेसकडून ही निवडणूक लढायला फारसे कोणी उत्सुक नसल्याने काँग्रेसने राजकीय खेळी खेळत भाजपच्याच इच्छुक उमेदवार रवींद्र भोयर यांना काँग्रेस पक्षात आयात करून घेतले. त्यामुळे शेवटच्या क्षणाला हातून निसटणार डाव भाजप रच उलटला. रवींद्र भोयर हे रेशीमबाग प्रभागातील नगरसेवक असून मागच्या तीस वर्षापासून ते भाजप व संघ परिवारात काम करत होते. पक्षाने त्यांची तिकीट नाकारल्याने  नाराज होऊन त्यांनी कॉंग्रेसशी जवळीक साधली. आजच काँग्रेसने रवींद्र भोयर यांचा काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करून घेत त्यांच्या टिकीटीचा मार्ग मोकळा केला आणि संध्याकाळी त्यांच्या नावाची घोषणा झाली.

भाजपकडे निर्णायक आघाडी असली तरीही भाजप अत्यंत सावध पवित्र्याने निवडणुकीला पुढे जात आहे. तर काँग्रेस ही आपल्या  आयात उमेदवाराच्या जोरावर विजयाचा दावा करत आहे.

पुणे पालिकेत अशी ही बनवाबनवी,नाट्यगृहातून 2 कोटींचे स्पिकर्स चोरले अन्...

काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाची उमेदवारी निश्चित झाली असली तरी ही निवडणूक वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय खेळी वर अवलंबून असते. त्यामुळे भाजपमध्ये पडद्या पाठीमागून काय हालचाली होतात त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचे भविष्य अवलंबून आहे.  तर शेवटच्या क्षणाला रवींद्र भोयर यांना पक्षात घेऊन काँग्रेसचे मतदार त्यांना स्वीकारणार का यावर रवींद्र भोयर यांचे भविष्य अवलंबून असेल.

First published: