प्रकाश आंबेडकरांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसचा नवा प्लॅन

प्रकाश आंबेडकरांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसचा नवा प्लॅन

वंचित फॅक्टरला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून रणनीतीही आखण्यात आली.

  • Share this:

सागर कुलकर्णीमुंबई, 31 ऑक्टोबर : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेतही काँग्रेसला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. काँग्रेसच्या नेत्यांनी पराभवाची कारणं सांगत असताना प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीकडेही बोट दाखवलं. त्यानंतर आता काँग्रेसच्या विधानसभा निवडणूक आढावा बैठकीत वंचित आघाडीवर जोरदार चर्चा झाली आहे. तसंच वंचित फॅक्टरला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून रणनीतीही आखण्यात आली.

भविष्यात काँग्रेस पक्षातील दलित चेहरा अधिक प्रभावी करण्याची भूमिका काँग्रेसच्या बैठकीत मांडण्यात आली. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस पक्षाला 14 विधानसभा जागांवर फटका बसला. यामुळे यापुढील काळात दलित मतदारांवर अधिक लक्ष्य केंद्रीत करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत नेत्यांकडून मांडण्यात आली.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने सोबत कोणताही पक्ष नसताना विधानसभा निवडणुकीत चांगली मतं मिळवत प्रस्थापितांना धक्का दिला. त्यामुळे आगामी काळात वंचितची भूमिका निर्णायक ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला तब्बल 42 लाख मतं मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित कशी कामगिरी बजावणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.

वंचितला विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, राज्यातली आपली ताकद दाखवून देण्यात वंचितला यश आलं. साधारण 12 मतदारसंघांत वंचितचे उमेदवार 15 व्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. 288 पैकी साधारण 55 मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली.

मूर्तिजापूरमध्ये प्रतिभा अवचार यांनी अतिशय चांगली टक्कर दिली. त्यांना 57613 मतं मिळाली. अवचार या अवघ्या 1010 मतांनी पराभूत झाल्या. अकोला पूर्व मतदारसंघात हरिदास भदे यांचा केवळ 2440 मतांनी पराभव झाला. अकोट मतदारसंघात अ‍ॅड. संतोष रहाटे यांनी 30040 मतं घेऊन चांगली टक्कर दिली. बाळापूरमध्ये धैर्यवर्धन फुंडकर यांनी 50 हजारांहून अधिक मते घेतली.

बुलडाणा मतदारसंघात विजय शिंदे यांनी 41 हजार मतं घेतली. कळमनुरी मतदारसंघात अजित मगर यांनी 66 हजारांहून अधिक मतं घेऊन शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांना दमवलं. लोहा मतदारसंघात शिवकुमार नरगळे यांनी 34686 मतं घेतली.

VIDEO : मीरा-भाईंदरमध्ये तरुणांची गुंडगिरी, तलवारीनं दोघांवर जीवघेणा हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 04:01 PM IST

ताज्या बातम्या