काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या उंबरठ्यावर, पण उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर प्रवेश

काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या उंबरठ्यावर, पण उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर प्रवेश

विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याने या आमदारांच्या पक्षांतराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र ही निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याने या आमदारांच्या पक्षांतराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार भारत भालके, आमदार सिद्धाराम म्हेत्रे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील बबन दादा शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात आज निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये येण्यास इच्छुक असणारे अनेक आमदार हे युतीत शिवसेनेच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंशी चर्चा करूनच भाजपला याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

भाजपमध्ये आज पुन्हा मेगाभरती

भारतीय जनता पक्षाची आज पुन्हा एकदा मेगाभरती होणार आहे. गेले अनेक दिवस भाजपमध्ये अनेक नेते येणार असल्याची चर्चा होती. आता अखेर भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश होणार आहेत. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आणि नवी मुंबईतले राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचा समावेश आहे. नाईक यांचा भाजप प्रवेश नवी मुंबईतील वाशी इथे होणार आहे. तर नुकताच राजीनामा दिलेले कृपाशंकर सिंह यांचा मात्र आज प्रवेश होण्याची शक्यता नसल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. या प्रवेशांच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पडणार आहे.

VIDEO :...तेव्हा जेटलींच्या घराचा आसरा होता, शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा

Published by: Akshay Shitole
First published: September 11, 2019, 11:12 AM IST

ताज्या बातम्या