शिवसेना-भाजपवर पलटवार करण्यासाठी आघाडीची बैठक, रणनीती आखणार

शिवसेना-भाजपच्या रणनीतीला उत्तर देण्यासाठी आघाडीचे नेतेही आता मैदानात उतरले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 04:42 PM IST

शिवसेना-भाजपवर पलटवार करण्यासाठी आघाडीची बैठक, रणनीती आखणार

मुंबई, 03 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवता यावा, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडत युतीतील शिवसेना-भाजपने विधानसभा विजयासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती करायला सुरुवात केली आहे. शिवसेना-भाजपच्या याच रणनीतीला उत्तर देण्यासाठी आघाडीचे नेतेही आता मैदानात उतरले आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. शिवसेना-भाजपला काटशह देण्याची रणनीती आखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळसाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर काही नेते या बैठकीला उपस्थितीत असल्याची माहिती आहे.

बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा?

या महिन्यातच विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीच्या जागावाटपावर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये विचारमंथन होण्याची शक्यता आहे. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतून सध्या मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग होत आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या या खेळीला कशाप्रकारे उत्तर द्यायचं, पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांविरोधात तुल्यबळ उमेदवार कसे द्यायचे, याबाबतही आजच्या बैठकीत आघाडीच्या नेत्यांकडून व्यूवरचना आखली जाण्याची शक्यता आहे.

महायुतीही सज्ज

Loading...

लोकसभा निवडणुकीत विराट विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय वर्तुळातील काही घडामोडींमुळे युती होणार की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र असं असलं तरीही विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत महायुती करून लढल्यास किती जागा मिळतील, याचा सर्व्हेदेखील भाजपने केला आहे.

विरोधकांतील नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेनं आपली दावेदारी आणखीनच मजबूत केली आहे. पण तरीही सध्यातरी हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याचा धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसत आहे. म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी महायुतीचा सूर आळवायला सुरुवात केली आहे.

VIDEO : कोकणात राष्ट्रवादीला धक्का, प्रदेशाध्यक्ष राहिलेले आमदार लवकरच सेनेत!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 04:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...