'मी सावरकर'वरून रंगला राजकीय आखाडा, महाविकास आघाडीकडून फडणवीसांवर पलटवार

'मी सावरकर'वरून रंगला राजकीय आखाडा, महाविकास आघाडीकडून फडणवीसांवर पलटवार

भाजपच्या भूमिकेला आता महाविकास आघाडीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, 17 डिसेंबर, मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला. यावेळी भाजपच्या सर्व आमदारांनी 'मी पण सावरकर' असं म्हणत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपच्या या भूमिकेला आता महाविकास आघाडीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अधिवेशनात सावकर यांच्याबाबतचा मुद्दा काढल्यानंतर महाविकास आघाडीने याआधी घडलेल्या काही घटनांची आठवण करून देत सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे. शेतकरी, महागाई, बेरोजगारी हे मुद्दे समोर आले तेव्हा देवेंद्र फडणवीस शांत होते. मात्र आता सावकरांचा मुद्दा आल्यानंतरच त्यांना जाग आली आहे, असं म्हणत सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात येत आहे.

भाजपकडून प्रतिहल्ला

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरूनच भाजपने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 'राम मंदिर चळवळ, स्वातंत्र्यवीर सावरकर, नागरिकत्व सुधारणा कायदा, समान नागरी कायदा, काश्मीर 370 याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना स्पष्ट शब्दात सांगणार का?' असा सवाल भाजपचे माजी खासदार किरीट सोमया यांनी उपस्थित केला. काल ठाकरे यांनी सावरकर मुद्दावरून भाजपावर टीका केली होती. त्यावरूनच आता सोमया यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रश्न विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2019 04:06 PM IST

ताज्या बातम्या