Home /News /maharashtra /

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या खासदारकीला आव्हान; काँग्रेस नेत्याने दाखल केली याचिका!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या खासदारकीला आव्हान; काँग्रेस नेत्याने दाखल केली याचिका!

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

    मुंबई, 06 जुलै: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी नागपूरमधून विजय मिळवला होता. या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. विशेष म्हणजे गडकरी यांनी 2019च्या निवडणुकीत पटोले यांचा 1.97 लाख मतांनी पराभव केला होता. निवडणुकीच्या निकालानंतर आता पटोले यांनी दोन महिन्यांनी गडकरी यांच्या विजयावर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान गडकरी यांनी आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. गडकरी यांनी नियमांचे पालन न केल्यामुळे ही निवडणूक रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे. पटोले यांनी ही याचिका केंद्रीय निवडणूक आयोग, आयोगाचे काही अधिकारी आणि नितीन गडकरी यांच्या विरुद्ध दाखल केली आहे. गडकरींच्या विरुद्ध आरोप करण्याची किंवा त्यांच्या विजयाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील नाना पटोले यांनी गडकरींच्या विजयावर आक्षेप घेतले आहेत. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर त्यांनी स्ट्रॉग रुमच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी इतके कमी व्यवस्था ठेवल्यामुळे शंका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले होते. मतमोजणी झाल्यानंतर पटोले यांनी निवडणूक प्रक्रियेचे पालन न केल्याचा आरोप केला होता. 24 तासात भाजपच्या दोन खासदारांच्या विरुद्ध याचिका गेल्या 24 तासात राज्यातील भाजपच्या दोन खासदारांच्या विरुद्ध याचिका दाखल झाल्या आहेत. गडकरींच्या विरुद्ध याचिका दाखल करण्याआधी भाजपच्या बीडमधील खासदार प्रीतम मुंडे उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला आहे. मुंडे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रीतम मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. काय आहे प्रीतम मुंडे यांच्याबाबतचा आक्षेप? 1. 'प्रीतम गोपीनाथ मुंडे' नावाने बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदार यादीत प्रीतम यांचं नाव आहे. तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याचा आरोप कालिदास यांच्य़ाकडून करण्यात आला आहे. 2. मुंबईतील वरळी येथील प्लॉट 1201 स्थावर मालमत्तेची माहिती प्रीतम मुंडे यांनी लपवली असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. 3. प्रीतम मुंडे यांच्याकडे वेगवेळ्या नावाने आयकर विभागाचे दोन ओळखप्रत्र आहे असंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. 4. प्रीतम मुंडे या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळात सहभागी आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्हय़ाची माहिती त्यांनी लपवली. दरम्यान, प्रीतम मुंडे यांच्याबाबत या चार मुख्य आक्षेपांसह एकूण सहा आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्याच्या आरोपात तथ्य आढळल्यास प्रीतम मुंडे यांचं पद धोक्यात येऊ शकतं. लोकसभा निवडणुकीत विजय लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा पराभव केला. यावेळीची निवडणूक प्रीतम मुंडे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल, असं बोललं जात होतं. मात्र प्रीतम यांनी राष्ट्रवादीवर मोठा विजय मिळवला. SPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे?
    First published:

    Tags: BJP, Election Memories, Lok sabha election 2019, Nagpur, Nagpur East s13a054, Nagpur S13p10, Nana patole, Nitin gadkari, Vidarbha Election

    पुढील बातम्या