माफी मागणार नाही, राहुल गांधी वक्तव्यावर ठाम

माफी मागणार नाही, राहुल गांधी वक्तव्यावर ठाम

मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून माफी मागणार नाही, अशी भूमिका राहुल गांधींनी घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांची जीभ पुन्हा घरसली आहे. प्रज्ञासिंह यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त असं संबोधलं. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर मोठी टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.

'दहशतवादी प्रज्ञासिंहने दहशतवादी गोडसेला देशभक्त म्हटलं. देशाच्या संसदेतील हा सर्वात वाईट दिवस आहे,' असा घणाघात राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर संसदेत गदारोळ झाला. एका खासदाराला दहशतवादी म्हणणाऱ्या राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत होती. मात्र मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून माफी मागणार नाही, अशी भूमिका राहुल गांधींनी घेतली आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लोकसभेत मोठा गोंधळ सुरू झाला आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. मात्र यावेळी शिवसेनेचे खासदार तटस्थ असल्याचं दिसत आहे.

भोपाळमधून खासदार झाल्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूर यांचा अनेक तोल सुटल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असंही साध्वी प्रज्ञा नुकतंच बरळल्या. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज साध्वी प्रज्ञा यांनी लोकसभेत माफी मागितली आहे.

समितीतून हकालपट्टी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांना पुन्हा 'देशभक्त'संबोधणाऱ्या भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर अडचणीत सापडल्या आहेत. प्रज्ञासिंह ठाकूर यांची संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या सल्लागारपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी संसदेत केलेले कथित वक्तव्य अत्यंत निंदनीय असून भाजप अशा विचारधारेचे समर्थन करत नाही, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितले आहे. प्रज्ञासिंह यांना आता भाजपच्या संसदीय बैठकीतही सहभागी होता येणार नसल्याचेही नड्डा यांनी सांगितले आहे.

दरम्यान, खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी बुधवारी लोकसभेत एका चर्चा सत्रात महात्मा गांधींची हत्या करणारे नथुराम गोडसे यांन देशभक्त संबोधले होते. त्यावरून लोकसभेत एकच गदारोळ झाला होता. याआधी लोकसभा निवडणूक सुरू असतानाही गोडसेला देशभक्त संबोधले होते. प्रज्ञा यांना कधीही मनापासून माफ करू शकणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.

First published: November 29, 2019, 3:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading